Lokmat Sakhi >Beauty > Diwali : दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवा तर ७ दिवस 'अशी' घ्या काळजी, दिवाळीत चेहऱ्यावर दिसेल चकाकते तेज

Diwali : दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवा तर ७ दिवस 'अशी' घ्या काळजी, दिवाळीत चेहऱ्यावर दिसेल चकाकते तेज

Before Diwali skin care tips : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस आणि मेकअप यापेक्षा घरगुती उपाय करणे केव्हाही जास्त चांगले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 04:36 PM2024-10-23T16:36:59+5:302024-10-23T18:08:27+5:30

Before Diwali skin care tips : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस आणि मेकअप यापेक्षा घरगुती उपाय करणे केव्हाही जास्त चांगले..

Diwali Special before Diwali skin care tips : If you want a glow on your face this Diwali, take care of it a week in advance... | Diwali : दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवा तर ७ दिवस 'अशी' घ्या काळजी, दिवाळीत चेहऱ्यावर दिसेल चकाकते तेज

Diwali : दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवा तर ७ दिवस 'अशी' घ्या काळजी, दिवाळीत चेहऱ्यावर दिसेल चकाकते तेज

दिवाळी आता अगदी एका आठवड्यावर आली आहे. एकीकडे घराची स्वच्छता, खरेदी, फराळा घाट या सगळ्यात आपण स्वत:ची काळजी घेणे विसरुन जातो. रोजच्या कामाचा ताण, सणावाराचे जास्तीचे काम त्यामुळे होणारी जागरणं या सगळ्याचा परीणाम आपल्या तब्येतीवर होत असतो. अपचन, अॅसिडीटी, उन्हात फिरणे यांमुळे चेहऱ्यावर डाग, पुरळ येणे, टॅनिंग यांसारख्या समस्या उद्भवतात. मग एकतर आपल्याला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस घ्याव्या लागतात नाहीतर भरपूर मेकअप करावा लागतो. पण यामध्ये बराच पैसा आणि वेळ दोन्हीही जाते. असे होऊ नये आणि फारसे काही न करता आपण दिवाळीत चांगले दिसावे यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे ऐन दिवाळीत चेहरा तजेलदार दिसेल. आता हे उपाय कोणते पाहूया (Before Diwali skin care tips)..

१.    दिवसभरात चेहर्‍यावर अनेक प्रकारची धूळ बसते. ती सध्या पाण्याने धुवून निघत नाही, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी न विसरता चेहरा फेस वॉश लावून स्वच्छ धुवावा. 

२. चेहरा धुतल्यावर थोडासा ओलसर असताना त्यावर माइश्चरायजर लावायला विसरू नये. सकाळी उठल्यावर चेहरा धुवा आणि त्यानंतरही मॉईश्चरायजर लावा. 

(Image : Google)
(Image : Google)

३. चेहर्‍याचा ग्लो हा तुमच्या हायड्रेशनवर अवलंबून असतो. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाण्याबरोबरच सरबतं, ताक, नारळ पाणी घ्यायला विसरु नका. 

४. घराबाहेर जाताना किंवा अगदी गॅसपुढे उभे राहून जेवण बनवताना न विसरता आधी सनस्क्रीन लावावे, जेणेकरुन चेहरा टॅन होणार नाही.
 
५. चेहऱ्याचे टॅनिंग, डाग काढण्यासाठी कोणतेही कठोर स्क्रब वापरू नका, नाहीतर चेहरा एक्सफॉलिएट होण्याऐवजी त्याला इजा होण्याचीही शक्यता असते. 
 
६. बटाटा, दही आणि मध किंवा बेसन, साय आणि हळद यांचा फेसपॅक बनवून चेहर्‍याला लावा. वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा, यामुळे चेहरा उजळेल. 

(Image : Google)
(Image : Google)

७. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. पुरेशी झोप चेहर्‍याच्या तजेल्यासाठी आवश्यक असते. 

८. चेहर्‍यावर पिंपल्स असतील तर ते बोटांनी, नखांनी अजिबात फोडू नका. त्यामुळे काळे डाग पडतात आणि ते नंतर बराच काळ तसेच राहतात. 
 

Web Title: Diwali Special before Diwali skin care tips : If you want a glow on your face this Diwali, take care of it a week in advance...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.