तेलकट त्वचेची काळजी घेणे खूप कठीण आहे कारण चेहरा नेहमी काळपट दिसतो. परंतु काळजी करू नका कारण तेलकट त्वचा चमकदार ठेवण्यासाठी फेशियल हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे जास्तीच तेल आणि साचलेली घाण काढून टाकते, मृत त्वचेच्या पेशींना बाहेर काढते, त्वचेच्या छिद्रांचा आकार कमी करते आणि त्वचेला शांत करते. तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून एकदा फेशियल केल्यानं चेहऱ्यावर चमक येते आणि तुम्ही तरुण दिसता.(Facial tips in marathi)
ऐन दिवाळीच्या (Diwali 2021) तोंडावर तुम्ही ऑफिसच्या आणि घरच्या कामांमध्ये व्यस्त असाल तर तुम्ही घरच्याघरी फेशियल फक्त १० मिनिटात करू शकता. फेशियल ही एक प्रक्रिया आहे. (Facial at home step by step) ज्यात चेहरा स्वच्छ करणे, वाफ घेणे, फेस मास्क लावणे, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या 5 मूलभूत पायऱ्या असतात. नैसर्गिक गोष्टींच्या साहाय्याने घरच्या घरी या पायऱ्या सहज करता येतात. दिवाळीच्या निमित्ताने तेलकट त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही हे फेशियल फक्त 10 मिनिटांत घरी करू शकता.
१) क्लिनिंग (Cleaning)
तेलकट त्वचेसाठी सगळ्यात आधी त्वचेचं क्लिनिंग करणं महत्वाचं आहे. ही पायरी केल्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. यासाठी १ चमचा ओट्स घ्या आणि त्यात दूध किंवा दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर, मानेवर लावा. कमीतकमी 5 मिनिटे गोलाकार हालचालीत बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि चेहरा कोरडा करा.
2) स्टिम घेणं (Steam)
चेहऱ्याच्या फेशियलमध्ये दुसऱ्या पायरीमध्ये वाफ घेणं समाविष्ट आहे. वाफ घेतल्याने छिद्रे उघडतात जे फेस मास्कमध्ये असलेल्या घटकांच्या पोषक घटकांना त्वचेत प्रवेश करण्यास मदत करतात. एक भांडं घ्या त्यात पाणी गरम करा, डोकं टॉवेलने झाकून चेहऱ्यावर 5 मिनिटे वाफ घ्या.
3) फेस मास्क (Face Mask)
तेलकट त्वचेसाठी तुम्ही टोमॅटोचा रस, मुलतानी माती आणि दही फेस मास्क घरी सहज लावू शकता. ते लावल्याने त्वचेवर चमक येते. त्यासाठी एक चमचा मुलतानी माती घ्या. पेस्ट बनवण्यासाठी त्यात दही, टोमॅटोचा रस किंवा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट डोळ्यांशिवाय चेहरा आणि मानेवर लावा. रेफ्रिजरेटेड काकडीचे दोन तुकडे करा आणि डोळ्यांवर स्लाईज ठेवा
4) टोनिंग (Toing)
गुलाब पाणी हे एक अतिशय चांगले नैसर्गिक टोनर आहे. हे उघडलेले छिद्र बंद करते, त्वचा घट्ट करते आणि त्वचा चमकते. गुलाब पाण्यात थोडा कापूस बुडवा मग चेहरा आणि मानेवर हळूवारपणे लावा.
5) मॉईश्चराईजर (Moisturizer)
चांगल्या दर्जाचे वॉटर बेस मॉइश्चरायझर घ्या आणि ते चेहऱ्यावर आणि मानेला हळूवारपणे लावा. वरील सर्व स्टेप्स केल्यानंतर त्वचेला मॉइस्चराइज करणे महत्वाचे आहे आणि याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. याशिवाय तुम्ही सगळ्यात शेवटी डी टॅन पॅकही त्वचेवर लावू शकता. यामुळे मृतपेशी आणि काळपट त्वचा निघून जाण्यास मदत होते.