डोकं जाम ठणकायला लागलं की आपण तेल लावून डोक्याला मसाज (5 steps for head massage) करतो. किंवा बऱ्याच जणींचं असं असतं की ज्या दिवशी केस धुवायचे असतील, त्याच्या आदल्या दिवशी रात्री डोक्याला मालिश करायची. मालिश करायचं तंत्र बऱ्याच जणींचं सारखंच असतं. कुणी दोन्ही हातांचे तळवे जोरजोरात डोक्यावर (head massage with hair oil)घासतात आणि मसाज करतात तर कुणी बोटांची टोके तेलात बुडवतात आणि मग बोटांनीच डोक्याची (hair care tips) मसाज करतात. या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या डोक्याला, केसांना तेल लागतं, डोक्याची मसाज (head massage tips) होते पण जे रिलॅक्सेशन या मसाजमधून हवं असतं, ते काही आपल्याला मिळत नाही.
म्हणूनच जर खरोखरच रिलॅक्स व्हायचं म्हणून डोक्याला मसाज करणार असाल तर मसाज करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घ्यायला हवी. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Dietician Rujuta Divekar) यांनी इन्स्टाग्रामवर (instagram video) नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये डोक्याला चंपी करून रिलॅक्स कसं व्हायचं याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. बऱ्याचदा आपण मालिशच्या नावाखाली केसांना खूपच जोरजोरात खसाखसा चोळून तेल लावतो. अक्षरश: तेलाचे हात डोक्यावर रगडतो. यामुळे केसांचंही नुकसान होतं. कारण केसांची मुळं नाजूक होतात आणि मग केस गळतात. म्हणूनच तर केसांचं आरोग्यही चांगलं रहावं आणि आपल्यालाही रिलॅक्स वाटावं, यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या ५ स्टेप्स करून बघा.
स्टेप १
सगळ्यात आधी तर कोणत्याही एका हाताच्या तळव्यावर तेल घ्या. हा हात तुमच्या मस्तकावर म्हणजेच डोक्याच्या सगळ्यात वर, टाळूवर चोळा. मागे, पुढे या पद्धतीने हाताचा तळवा डोक्यावर चोळा आणि मसाज करा. थोड्यावेळ मसाज केल्यास तुमच्या हाताचा तळवा गरम झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे सांगताना ऋजुता दिवेकर म्हणाल्या की हाताचा तळवा जेवढा जास्त गरम होईल, तेवढा तुम्हाला जास्त स्ट्रेस आहे हे यावरून दिसून येतं. ॲसिडीटी, ताणतणाव, नैराश्य कमी करण्यासाठीही ही स्टेप उपयुक्त ठरते.
स्टेप २
हाताच्या तळव्याने मस्तकावर मसाज करून झाल्यानंतर त्याच तळव्याने मस्तकावर ५ ते ६ वेळा थपथप करा. यामुळेही ताणतणाव हलका होण्यास मदत होईल.
केसांचं गळणं, कोंडा आणि पांढरे केस.. 3 समस्या, 1 उपाय, असं बनवा हेअर ऑईल!
स्टेप ३
या स्टेपमध्ये आता आपल्याला आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला मालिश करायची आहे. यासाठी तुमच्या दोन्ही हातांच्या बोटांची टोके तेलात बुडवून घ्या. यानंतर दोन्ही हातांचे अंगठे कानाच्या मागच्या बाजूला टेकवा. बोटे तुमच्या स्काल्पच्या सगळ्यात खालच्या भागावर ठेवा आणि खालून वर अशा पद्धतीने गोलाकार बोटे फिरवत मसाज करा.. मागच्या बाजूच्या सगळ्या केसांना तेल लागेपर्यंत अशाच पद्धतीने मसाज करा. तुम्ही जसजशी मसाज कराल, तसातसा तुम्हाला रिलॅक्स होत जाण्याचा अनुभव येईल.
स्टेप ४
आपल्या मानेच्या लगतचा जो डोक्याचा सगळ्यात खालचा भाग असतो, तो बऱ्याचदा तेल न लागल्यामुळे कोरडाच राहतो. त्यामुळे या भागाला तेल लावण्याचं विसरू नका. यासाठी तुमच्या बोटांची टोके तेलात बुडवा आणि या भागाला खालून वर अशा पद्धतीने तेल लावून एक- दोन मिनिट मसाज करा.
स्टेप ५
डोक्याला मालिश करण्याची ही सगळ्यात शेवटची स्टेप. या स्टेपमध्ये आपण डोक्याच्या समोरच्या भागाला मसाज करणार आहोत. आता यासाठी सगळ्यात आधी तुमच्या हाताच्या बोटांची टोके तेलात बुडवा. यानंतर दोन्ही हातांचे अंगठे दोन्ही कानांच्या समोर ठेवा. आता जो डोक्याचा समोरचा भाग आहे त्या सगळ्या भागाला बोटांची टोके गोलाकार दिशेने फिरवत मसाज करा. अतिशय आरामदायी ठरणारा हा अनुभव आहे. या पद्धतीने डोक्याची मसाज केली तर खरोखरंच तुम्ही तर रिलॅक्स व्हालच पण केसांचं आरोग्यही सुधारेल.