Join us

बदाम फक्त मेंदूसाठी नसून, चेहऱ्यावरही करते कमाल; चंद्रासारखी चमक हवी तर, आत्ताच याचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2024 10:05 IST

DIY Almond Face Mask For Skin Lightening : दूध आणि बदामामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते..

सुक्या मेव्यांमध्ये बदाम हा सर्वात आरोग्यदायी मानला जातो (Almond). बदाम जेवढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे तेवढाच त्वचेलाही फायदा होतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते (Skin care Tips). ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी बदामाचा वापर फायदेशीर ठरू शकते (Beauty Tips). पण बदामाचा वापर चेहऱ्यावर नेमका कसा करावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

जर आपल्याला मुरुमांचे डाग, त्वचेचा पोत आणि त्वचेच्या निगडीत समस्या सोडवायच्या असतील तर, बदाम आणि दुधाचा वापर करून पाहा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सही कमी होऊ शकतात. त्वचेसाठी बदामाचा वापर नेमका कसा करावा? पाहा(DIY Almond Face Mask For Skin Lightening).

बदाम फेसपॅक कसा बनवायचा?

चेहऱ्यावर बदामाचा वापर करण्यासाठी आधी फेसपॅक तयार करा. यासाठी एक छोटी वाटी बदाम घ्या, त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी साल काढून किंवा सालीसकट मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात दूधही घाला. अशा प्रकारे बदामाचा फेसपॅक रेडी.

केसांचा भांग रुंद, पांढरे केस झाले? होमिओपॅथी तज्ज्ञांनी सांगितलं खोबरेल तेलाचा 'असरदार' उपाय

आता चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही वेळानंतर बदामाच्या तेलाच्या १ थेंबाने संपूर्ण चेहऱ्याची मालिश करा.

बदामाच्या फेसपॅकचे फायदे

- ज्यांची त्वचा कोरडी आणि निर्जीव आहे, त्यांनी हा फेसपॅक जरूर लावावा. यामुळे त्वचा मुलायम होते.

ना बेकिंग सोडा - ना तांदुळाचं पीठ, कपभर बेसनाची करा कमी तेल पिणारी - कुरकुरीत हॉटेलस्टाईल भजी

- डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठी आपण बदामाच्या फेसपॅकचा वापर करू शकता.

- बदामाच्या फेसपॅकमुळे त्वचा चमकदार होते.

- बदमाचा फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यास मदत करतात. यामुळे स्किन क्लिअर होते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स