Join us  

पावसाळ्यात चेहरा काळपट - टॅनिंगमुळे तेज कमी झालं? बेसन - बटाट्याचा सोपा उपाय; चेहरा करेल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 9:00 AM

DIY Besan Face Packs for All Skin Types for removing Tanning : महागडी टॅनिंग रिमुव्हल क्रीम कशाला हवी? बेसन - बटाट्यानेही काळपटपणा दूर होईल..

आजकाल टॅनिंगची समस्या खूप कॉमन होत चालली आहे (Beauty Tips). पावसाळ्यात चेहरा काळवंडतो. ज्यामुळे चेहऱ्याचा तेज कमी होतो. टॅनिंग घालवण्यासाठी आपण त्वचेची पुरेपूर काळजी घेतो (Tanning removal). सनक्रीम किंवा टॅनिंग रिमूव्हर क्रीमचा देखील वापर करतो. पण यात देखील केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण ब्यूटी उत्पादनांचा वापर न करताही आपण टॅनिंग घालवू शकता. यासाठी विशेष उतपादानांची गरज नाही. काही घरगुती साहित्यातही आपण घरगुती टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करू शकता. यासाठी बेसन, तांदुळाचं पीठ आणि कॉफी लागेल. कशा पद्धतीने घरगुती टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करावी पाहूयात(DIY Besan Face Packs for All Skin Types for removing Tanning).

टॅनिंग रिमुव्हल क्रीम करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

धुतल्यानंतर केस गळतात - शेपटीगत दिसतात? शाम्पूमध्ये घाला १ खास माती; केसांची चमक वाढेल

तांदुळाचं पीठ

कॉफी

बटाट्याचा रस

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन, तांदुळाचं पीठ आणि कॉफी पावडर घ्या. त्यात २ चमचे बटाट्याचा रस घालून मिक्स करा. सर्व साहित्य एकत्रित व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा. पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. आपण या क्रीमचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे नक्कीच टॅनिंग दूर होईल.

बेसन

चेहऱ्यासाठी बेसनाचे अनेक फायदे आहेत. या पिठात प्रोटीन, लिनोलिक आणि ओलेइक ऍसिड सारखी अनसॅच्युरेडेट फॅट्स असतात. यासह रिबोफ्लेविन, नियासिन, फोलेट आणि बीटा-कॅरोटीन सारखी जीवनसत्त्वे असतात. ज्याचा चेहऱ्याला पुरेपूर फायदा होतो.

केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

बटाट्याचा रस

चेहऱ्यासाठी बटाट्याच्या रसाचे अनेक फायदे आहेत. यात लोह, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन असते. जे पोर्समधून घाण काढून चेहरा स्वच्छ करते. यासह डोळ्यांखालील वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करण्यासही प्रभावी ठरते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमोसमी पाऊस