कॉफी हे एक लोकप्रिय पेय आहे. सकाळ असो किंवा सायंकाळ कॉफीशिवाय तरतरी येत नाही. काहींना कॉफीशिवाय जमतच नाही. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण आपण कधी कॉफीच्या फेसमास्कचा वापर केला आहात का? चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी असे आपल्याला वाटत असेल तर, कॉफी आणि एका कच्च्या बटाट्याचा वापर करून पाहा.
प्रत्येक ऋतूनुसार चेहऱ्याच्या समस्या देखील बदलतात. पण या समस्या सोडवण्यासाठी आपण कॉफीचा वापर करू शकता. कॉफीमुळे चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. नितळ - निरोगी त्वचा हवी असल्यास कॉफी - बटाट्याचा फेसमास्कचा वापर करून पाहा(DIY Coffee Face Masks for Glowing Skin Instantly!).
कॉफी - बटाट्याचा फेसमास्क करण्यासाठी लागणारं साहित्य
कॉफी
बटाटा
टोमॅटो
लिंबाचा रस
हळद
ऐन तारुण्यात त्वचा म्हातारी दिसते? चेहरा वयस्कर? ४ चुका करता त्याचे परिणाम! काय टाळाल...
एलोवेरा जेल
केसर
व्हिटामिन ई कॅप्स्यूल
ग्लिसरीन
आठवड्यात किती वेळा केस धुणे योग्य? सतत धूत असाल तर किंवा आठवड्यातून एकदाच नहात असाल तर..
अशा पद्धतीने करा फेसमास्क
सर्वप्रथम, बटाटा किसून त्यातील पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता त्यात एक टेबलस्पून टोमॅटोचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा कॉफी पावडर, चिमुटभर हळद, एक टेबलस्पून एलोवेरा जेल घालून मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर हाताने किंवा ब्रशने चेहऱ्यावर लावा. व १० मिनिटानंतर चेहरा एका कापडाने पुसून काढा.
आता एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घ्या, त्यात केसर, व्हिटामिन ई च्या २ कॅप्स्यूल, एक टेबलस्पून ग्लिसरीन घालून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा. व काही वेळानंतर चेहरा स्वच्छ धुवा. या उपायामुळे नक्कीच फरक दिसेल, व चेहऱ्याच्या निगडीत समस्या देखील कमी होतील.