आता काही दिवसात उन्हाळा सुरु होईल. उन्हाळ्यात गरम हवा, धूळ, माती आणि प्रदुषणामुळे स्किन टॅन होते. शरीराच्या बऱ्याच भागात काळे डाग पडतात. टॅनिंगमुळे स्किन अधिक खराब दिसते. ज्यामुळे आपण फुल बाह्यांचे कपडे घालण्यास प्राधान्य देतो. शक्यतो स्लिव्जलेस ड्रेस घालणं टाळतो (Skin Care Tips).
स्किन टोन एकसारखी दिसावी व टॅनिंग दूर करण्यासाठी आपण सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण फक्त हळदीच्या मदतीने देखील टॅनिंग दूर करू शकता (Sun Burn). टॅनिंग घालवण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा? हळदीचा वापर करून स्किन क्लिअर होऊ शकते का? पाहूयात(DIY home remedies to get rid of sun tan ).
टॅनिंग घालवण्यासाठी हळदीचा वापर
हळद आणि लिंबाचा रस
हळद हा मसाला फक्त पदार्थापुरताच मर्यादित नसून, स्किन आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात. यात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. शिवाय यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या सोडवतात.
ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी
यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा हळद, कच्चे दूध आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहरा आणि स्किनवर लावा. १० ते १५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. नंतर हाताने घासून पेस्ट काढा. शेवटी पाण्याने चेहरा धुवा.
कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..
हळद आणि दही
हळदीमध्ये दही मिसळून टॅनिंग केलेल्या भागावर लावल्याने, टॅनिंग दूर होते. यासाठी एका वाटीत दही घ्या, त्यात एक चमचा हळद घालून पेस्ट बनवा. तयार पेस्ट आंघोळीच्या २० मिनिटे आधी स्किनवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवा.