Lokmat Sakhi >Beauty > DIY: घरीच तयार करा कंडिशनर, केसांवर खुलेल नॅचरल ब्राऊन शेड, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय

DIY: घरीच तयार करा कंडिशनर, केसांवर खुलेल नॅचरल ब्राऊन शेड, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय

Hair care tips: फक्त २ पदार्थ वापरून घरच्याघरी हे कंडिशनर (home made conditioner for hair) तयार करता येतं.. यासाठी फक्त १० मिनिटांचा वेळ काढा  आणि केसांना कसा मस्त शेड येतो ते बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 03:03 PM2022-02-09T15:03:57+5:302022-02-09T15:04:30+5:30

Hair care tips: फक्त २ पदार्थ वापरून घरच्याघरी हे कंडिशनर (home made conditioner for hair) तयार करता येतं.. यासाठी फक्त १० मिनिटांचा वेळ काढा  आणि केसांना कसा मस्त शेड येतो ते बघा...

DIY: Homemade Conditioner, Natural Brown Shade For Hair, Best Remedy For White or gray Hair | DIY: घरीच तयार करा कंडिशनर, केसांवर खुलेल नॅचरल ब्राऊन शेड, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय

DIY: घरीच तयार करा कंडिशनर, केसांवर खुलेल नॅचरल ब्राऊन शेड, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय

Highlightsकेसांना नैसर्गिक पद्धतीने ब्राऊन शेड येण्यासाठी हा उपाय दर आठवड्यातून एकदा नियमितपणे करावा.

काळ्याभोर केसांचं सौंदर्य वेगळंच असतं, हे अगदी खरं आहे.. तरीही कधी कधी केसांना हलकासा चॉकलेटी  किंवा ब्राऊन रंग यावा, असं आपल्याला वाटतं.. कारण अशा रंगाच्या चमकदार केसांचं सौंदर्यही भलतंच आकर्षक असतं.. केसांना छान रंग यावा, असं तर वाटतं आहे, पण त्यासाठी विकत मिळणारे, केमिकल्सचा मारा असणारे रंग नको असतील आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हेअर कलरवर हजारो रूपये खर्च करण्याची इच्छा नसेल, तर हा होम मेड स्वस्तात मस्त उपाय ट्राय करून बघा.. 

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातल्याच २ वस्तूंचा वापर करायचा आहे. त्यामुळे हा उपाय करून केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही, हे नक्की. शिवाय हे आपल्या केसांना मऊ आणि चमकदार बनविणारं एक नॅचरल कंडिशनर असणार आहे. त्यामुळे शाम्पूनंतर रेडिमेड किंवा विकत मिळणारं कंडिशनर लावण्याऐवजी हे पाणी तुम्ही कंडिशनर म्हणून वापरू शकता. केसांचं पोषण होईल, त्यांना नवी चमकही येईल आणि शिवाय त्यांना छान लाईट ब्राऊन शेड देखील मिळेल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे..

 

कसा तयार करायचा केसांसाठी नॅचरल कलर.. (natural hair colour)
- हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात १ ग्लास पाणी घ्या. 
- या पाण्यात २ टेबलस्पून चहा पावडर टाका आणि हे पाणी उकळायला ठेवा.
- पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा.
- पाणी गाळून एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्या.
- आता या पाण्यामध्ये २ टीस्पून कॉफी पावडर टाका. 
- हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.. घरच्या घरी तुमच्या केसांना लाईट ब्राऊन शेड देणारं नॅचरल होम मेड कंडिशनर झालं तयार...

 

या कंडिशनरचा वापर कसा करायचा
- शाम्पू केल्यानंतर हे पाणी केसांवर टाका. सगळे केस या पाण्याने व्यवस्थित ओले होतील ते पहा.. 
- त्यानंतर एखाद्या मिनिटाने केस नुसत्या पाण्याने धुवून टाका. 
- केसांना नैसर्गिक पद्धतीने ब्राऊन शेड येण्यासाठी हा उपाय दर आठवड्यातून एकदा नियमितपणे करावा.
- हा उपाय नियमितपणे केल्यास पांढऱ्या केसांची समस्याही सुटू शकते, असे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: DIY: Homemade Conditioner, Natural Brown Shade For Hair, Best Remedy For White or gray Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.