Lokmat Sakhi >Beauty > ६ गोष्टी वापरुन घरच्याघरी बनवा नाईट क्रिम, निस्तेज त्वचा दिसेल एकदम चमकदार 

६ गोष्टी वापरुन घरच्याघरी बनवा नाईट क्रिम, निस्तेज त्वचा दिसेल एकदम चमकदार 

Beauty Tips: टॅनिंगमुळे त्वचेवर पॅचेस दिसत असतील, त्वचा निस्तेज झाली असेल तर हा उपाय करून बघा...(Homemade Night Cream For Glowing Skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 02:11 PM2023-08-10T14:11:37+5:302023-08-10T14:15:39+5:30

Beauty Tips: टॅनिंगमुळे त्वचेवर पॅचेस दिसत असतील, त्वचा निस्तेज झाली असेल तर हा उपाय करून बघा...(Homemade Night Cream For Glowing Skin)

DIY: How to make homemade night cream? Night cream for glowing skin, Night cream for removing tanning  | ६ गोष्टी वापरुन घरच्याघरी बनवा नाईट क्रिम, निस्तेज त्वचा दिसेल एकदम चमकदार 

६ गोष्टी वापरुन घरच्याघरी बनवा नाईट क्रिम, निस्तेज त्वचा दिसेल एकदम चमकदार 

Highlightsया उपायामुळे अगदी महिनाभरातच त्वचा पुन्हा चमकदार आणि फ्रेश दिसू लागेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

त्वचेची काळजी घेण्यासाठी दरवेळी विकतचं एखादं क्रिम आणून तेच चेहऱ्यावर लावलं पाहिजे, असं काही नाही. कारण आपल्या घरातच असे अनेक पदार्थ असतात, जे योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचेसाठी खरोखरच वरदान ठरू शकतील. आता त्वचेचं खूप टॅनिंग झालं असेल किंवा त्वचा टॅनिंगमुळे (tanning) खूपच निस्तेज झाली असेल, तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा (Night cream for glowing skin). या उपायामुळे अगदी महिना भरातच त्वचा पुन्हा चमकदार आणि फ्रेश दिसू लागेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये नाईट क्रिम (homemade night cream) कसं तयार करायचं याविषयी सांगितलं आहे.

 

नाईट क्रिम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
१ ग्रीन टी बॅग 

१ टीस्पून नारळाचं तेल

२ टीस्पून ॲलोव्हेरा जेल

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणारे ६ घरगुती उपाय. महागड्या क्रीमचीही गरज नाही, चेहरा चमकेल

१ टीस्पून हळद

२ ते ३ थेंब लिंबाचा रस

२ व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल

 

कसं तयार करायचं नाईट क्रिम?
१. सगळ्यात आधी अर्धा कप पाणी उकळून घ्या आणि त्यात ग्रीन टी ची एक बॅग अर्धा तास बुडवून ठेवा.

२. आता एका वाटीमध्ये नारळाचं तेल, हळद, लिंबाचा रस, व्हिटॅमिन ई कॅप्सूल असं सगळं घ्या.

लिटरभर दूध नासलं तर काय कराल? फेकू नका, फक्त २ स्टेप्समध्ये करा सुंदर कलाकंद

३. नंतर त्यामध्ये ॲलोव्हेरा जेल टाका. सगळ्यात शेवटी ग्रीन टी बुडवून ठेवलेलं पाणी टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

४. ४ ते ५ दिवस तुम्ही हे क्रिम वापरू शकता. रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि घरी तयार केलेलं हे नाईट क्रिम लावून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.

 

नाईट क्रिम वापरण्याचे फायदे
१. महिना भरातच त्वचा चमकदार, नितळ दिसू लागेल.

२. त्वचेवरील डार्क स्पॉट्स कमी होतील.

३. टॅनिंग कमी होऊन त्वचेचा पोत एकसारखा होईल. 

 

Web Title: DIY: How to make homemade night cream? Night cream for glowing skin, Night cream for removing tanning 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.