केसांना व्यवस्थित पोषण मिळून ते चमकदार आणि मजबूत व्हावेत, यासाठी ब्यूटी पार्लर किंवा एखाद्या हेअर एक्सपर्टकडे केसांसाठी केरॅटीन ट्रीटमेंट (Keratin treatment at home) उपलब्ध असते.. केसांवर अशा प्रकारचे सौंदर्योपचार करून घेणे हा खरोखरंच एक महागडा कार्यक्रम असतो.. १० ते ५० हजार रूपये या ट्रीटमेंटसाठी मोजावे लागतात.. आता एवढे पैसे केसांवर खर्च करणे हे खरोखरंच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे काम...म्हणूनच तर केसांना अगदी तसाच इफेक्ट देण्यासाठी घरच्या घरी करून बघा हा सोपा उपाय..
केरॅटिन ट्रीटमेंट का करण्यात येते...(benefits of keratin treatment)
- धुळ, ऊन, प्रदुषण यामुळे केसांचा पोत खराब होत जातो. केस कोरडे आणि निस्तेज, रुक्ष होत जातात. त्यामुळेच केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केरॅटिन ट्रिटमेंट केली जाते.
- डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसांत कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं.. त्यामुळे कोंडा घालविण्यासाठीही केरॅटिन ट्रीटमेंट फायदेशीर आहे..
- वाढत्या वयानुसार केसांना आवश्यक असणारे प्रोटीन कमी होत जाते. बऱ्याचदा आहारातून केसांना पोषण मिळाले नाही तरी केसातील प्रोटीन कमी होते आणि केस खराब होऊ लागतात. गळू लागतात, चिकट किंवा फ्रिजी होतात. म्हणून केसांचा चिकटपणा दूर करून त्यांना शाईनी आणि बाऊन्सी करण्यासाठी केरॅटिन ट्रिटमेंट करतात..
घरच्याघरी कशी करायची केरॅटिन ट्रीटमेंट (how to do keratin treatment at home?)
- केसांना घरच्याघरी केरॅटिन ट्रीटमेंट कशी करायची या विषयीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या beautycaresindia या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
- केसांवर केरॅटिन ट्रिटमेंट करण्यासाठी शिजवलेला भात, दही आणि कॅस्टर ऑईल या तीन गोष्टी लागणार आहेत.
- सगळ्यात आधी तर शिजवलेला भात ३ टेबलस्पून घ्या. त्यात थोडेसे पाणी टाका आणि मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
- भाताची पेस्ट एका बाऊलमध्ये काढा. त्यात २ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून कॅस्टर ऑईल टाका.
- हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. स्काल्पला आणि केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका.
- हा उपचार केल्यामुळे केस सिल्की आणि शाईनी होतील. केसांचा चिकटपणा कमी होऊन ते रेशमासारखे मऊ आणि झुळझुळीत होतील..