Lokmat Sakhi >Beauty > फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

DIY lip masks to get brighten pink lips from darker ones! घरात दुध - मध - गुलाब जल आहे? या साहित्यांपासून बनवा लिपमास्क, ओठांवरील काळपटपणा होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 01:03 PM2023-03-10T13:03:41+5:302023-03-10T13:04:54+5:30

DIY lip masks to get brighten pink lips from darker ones! घरात दुध - मध - गुलाब जल आहे? या साहित्यांपासून बनवा लिपमास्क, ओठांवरील काळपटपणा होईल दूर

DIY lip masks to get brighten pink lips from darker ones! | फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

मऊ - गुलाबी ओठ कोणाला नाही आवडत. पण गुलाबी ओठ मिळवण्यासाठी ओठांची तितकी काळजी घ्यावी लागते. बदलत्या ऋतूनुसार ओठांचा रंग बदलतो. काही वेळेला महिलावर्ग ओठांवरील काळपटपणा लिपस्टिक लावून लपवू शकतात. मात्र, मुले आणि पुरुष मंडळींना काळपट ओठ लपवणे कठीण जाते. ओठ काळपट पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

महिलांचे ओठ लिपस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे काळे पडतात. अनेक लिपस्टिकमध्ये केमिकलयुक्त रसायने आढळतात. ज्यामुळे ओठांची त्वचा काळपट पडू लागते. हा काळपटपणा दूर करण्यासाठी एक घरगुती उपाय मदतीला येईल. या लिपमास्कमुळे ओठ कोमल व गुलाबी दिसतील(DIY lip masks to get brighten pink lips from darker ones!).

लिपमास्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य

गुलाब जल

कच्चे दुध

मध

व्हिटॅमिन सीचे महागडे फेसपॅक वापरता? त्यापेक्षा पपई खा आणि पपईच्या सालांचा करा फेसपॅक, पाहा इफेक्ट

या साहित्यांचे ओठांवर होणारे फायदे

गुलाब जल नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. ओठांवरील काळपटपणा दूर करून, ओठांना मऊ व गुलाबी बनवते.

मध ओठ आणि त्वचेला उत्तमरित्या एक्सफोलिएट करते. यासह मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

कच्चे दूध ओठांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे ओठ मुलायम राहते.

महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

लिपमास्कचा करा असा वापर

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे मध घ्या. आता त्यात एक चतुर्थांश कप कच्चे दूध घाला. तसेच त्यात सुमारे एक चमचा गुलाबजल घालून मिक्स करा. हे तिन्ही मिश्रण चांगले मिसळून घ्या. मिक्स केल्यानंतर हा मास्क ओठांवर लावा. साधारण ५ मिनिटे हलक्या हातांनी ओठांवर मसाज करा.

एक चुटकी हळद की किंमत तुम क्या जानो.. लावा ३ प्रकारे, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

१० मिनिटानंतर पाण्याने ओठ स्वच्छ करा. हा लिपमास्क आपण आठवड्यातून सुमारे २ वेळा वापरू शकता. यामुळे ओठांवरील काळपटपणा कमी होईल.

Web Title: DIY lip masks to get brighten pink lips from darker ones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.