मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरले जाते (Mustard Oil). यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात (Grey Hairs). मोहरी तेल आपल्या त्वचेसाठी आणि केसांमध्ये वापरले जाते. केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर आहे. हे केस वाढवण्यास उपयुक्त आहे. शिवाय केसांच्या निगडीत अनेक समस्या सुटतात.
मोहरीच्या तेलात अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते, आणि ब्लड सर्क्युलेशनही सुधारते. पण या तेलाच्या वापराने आपण केस देखील काळे करू शकता. केस काळे करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर कसा करावा? यामुळे केस काळे खरंच होऊ शकतात का? पाहूयात(DIY Mustard Oil Hair Mask: For Grey Hairs).
केस काळे करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर कसा करावा?
लागणारं साहित्य
मोहरीचे तेल
चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?
हळद
कॉफी
अशा पद्धतीने तयार करा केस काळे करणारे तेल
एका छोट्या कढईत ४ चमचे मोहरीचे तेल घ्या. त्यात एक चमचा हळद, एक चमचा कॉफी घालून मिक्स करा. कढई गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर फ्लेम ठेवा. तेलाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा. १० मिनिटानंतर गॅस बंद करा. आणि तेल थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे केस काळे करणारे तेल तयार.
फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..
केस काळे करणारे तेल केसांना कसे लावायचे?
सर्वात आधी केस विंचरून घ्या. बोटाच्या टोकावर तेल घेऊन स्काल्प आणि केसांच्या टोकापर्यंत लावा. एका तासानंतर केस शाम्पूने धुवून काढा. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.