Join us  

चमचाभर तांदळाचे पीठ-चमचारभर कोरफड जेल; चेहऱ्याला लावा- मिळवा चकचकीत कोरियन ब्यूटी ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 3:58 PM

DIY Rice Flour Face Pack for Smooth and Bright Skin, get Korean Glow अतिशय सोपा उपाय, तुमच्या चेहऱ्यावर येईल सुंदर तेज

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण खूप काही गोष्टी करतो. प्रत्येक ऋतूनुसार त्वचेच्या समस्या देखील बदलतात. त्यानुसार बाजारात विविध प्रकारचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स मिळतात. काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायनांचा वापर केला जातो. ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता वाढते. सध्या महिलावर्ग घरगुती पदार्थ चेहऱ्यावर लावण्यास प्राधान्य देत आहे.

सध्या ब्यूटी ट्रेण्डमध्ये कोरियन ब्यूटी खूप चर्चेत आहे. कोरियन महिलांची स्किन ही एका काचेप्रमाणे चमकते. त्यांच्या चेहऱ्यावर ही चमक नेमकी कुठून येते? हा सवाल अर्थात तुमच्या मनातही आला असेल. कोरियन महिलांसारखी तुकतुकीत - निखळ त्वचा हवी असेल तर, तांदळाच्या पिठाचा वापर करून फेसमास्क तयार करा. ज्यामुळे नक्कीच चेहऱ्यावर चमक येईल. व चेहरा ग्लो करेल(DIY Rice Flour Face Pack for Smooth and Bright Skin, get Korean Glow).

कोरियन फेसमास्क करण्यासाठी लागणारं साहित्य

एलोवेरा जेल

तांदळाचे पीठ

पांढऱ्या केसांना डाय आणि मेहंदी लावायची गरजच नाही, २ घरगुती गोष्टी लावा-केस होतील काळेभोर

या पद्धतीने करा फेसमास्क

चेहऱ्यावर कोरियन ग्लो हवं असेल तर, तांदळाच्या पिठाचा वापर करा. यासाठी एका वाटीत तांदळाचे पीठ, व त्यात एलोवेरा फ्रेश जेल मिक्स करा. हे मिश्रण चमच्याने सतत मिक्स करा. मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी आपण ब्रशचा देखील वापर करू शकता.

ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा. २० मिनिटानंतर कॉटन पाण्यात बुडवून चेहऱ्यावरील पेस्ट काढा. व चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर बर्फाच्या तुकड्याने चेहऱ्याला शेक द्या. यासोबत आपली रोजची स्किन केअर रुटीन फॉलो करा. आपण या फेसमास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

एलोवेरा जेलचे फायदे

कोरफडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेचे पोषण करण्यास मदत करतात.

कोरफडीचा वापर त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी केला जातो.

चमचाभर तूप करेल चेहऱ्यावर जादू, चेहरा दिसेल इतका तजेलदार की फोटो फिल्टरची गरजच नाही..

एलोवेरा जेल त्वचेची खोलवर जाऊन स्वच्छता करते. ज्यामुळे पोर्स स्वच्छ होतात.

तांदळाच्या पिठाचे फायदे

तांदळाच्या पिठात त्वचेवर चमक आणण्याचे गुणधर्म आहेत.

तांदळाचे पीठ त्वचेतील मृत पेशीही काढून टाकते.

तांदळाचे पीठ त्वचेतील डार्क स्पॉट, अॅक्ने काढण्यास मदत करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी