Lokmat Sakhi >Beauty > जुन्या जीन्सचा कंटाळा आलाय? जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड जीन्स लूक! जीन्स पुरानी- फॅशन नयी

जुन्या जीन्सचा कंटाळा आलाय? जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड जीन्स लूक! जीन्स पुरानी- फॅशन नयी

Home hacks: तीच ती जुनी जीन्स वापरून कंटाळा आला.. टाकूनही द्यावी वाटत नाही ना? म्हणूनच तर ही घ्या एक सॉलिड आयडिया आणि तुमच्या जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड (DIY: ripped jeans) लूक.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 06:46 PM2022-01-08T18:46:20+5:302022-01-08T18:49:47+5:30

Home hacks: तीच ती जुनी जीन्स वापरून कंटाळा आला.. टाकूनही द्यावी वाटत नाही ना? म्हणूनच तर ही घ्या एक सॉलिड आयडिया आणि तुमच्या जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड (DIY: ripped jeans) लूक.. 

DIY tricks, how to make ripped jeans from your old jeans at home | जुन्या जीन्सचा कंटाळा आलाय? जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड जीन्स लूक! जीन्स पुरानी- फॅशन नयी

जुन्या जीन्सचा कंटाळा आलाय? जुन्या जीन्सला द्या नवा रिप्ड जीन्स लूक! जीन्स पुरानी- फॅशन नयी

Highlightsमहागड्या रिप्ड जीन्स विकत घेण्यापेक्षा जुन्या जीन्सला नवा लूक दिलेलं कधीही चांगलंच आणि खिशासाठी परवडेबल.. 

जीन्स म्हणजे प्रत्येकाच्याच कपाटातली एक अत्यावश्यक वस्तू झाली आहे. निळी आणि काळी अशा एवढ्या बेसिक जीन्स (fashion tricks with jeans) असल्या तरी चालतात.. कित्येक टॉप्सवर, कुर्तींवर या जीन्स आलटून पालटून चालून जातात. बरं या जीन्सची आणखी एक खासियत म्हणजे कितीही धुमसून वापरलं तरी या जीन्स काही फाटत नाहीत की त्यांच्यावर साधा ओरखडाही येत नाही. 

 

वापरून वापरून कंटाळा आला तरी जीन्स काही खराब होत नाही. त्यामुळे मग शेवटी तिचा कंटाळा येऊ लागतो. पण कितीही कंटाळा आला तरी जीन्स टाकून द्यावी, असं काही वाटत नाही आणि नव्या जीन्सची कपाटात भरती झाल्यामुळे मगही जीन्स घालावीही वाटत नाही. असंच जर तुमचं झालं असेल तर हा घ्या एक सोपा उपाय. ही DIY ट्रिक वापरा आणि तुमच्या जुन्या जीन्सला द्या स्टायलिश रिप्ड लूक (how to give ripped look to your old jeans)... बघा जीन्स तीच जुनी..पण स्टाईल नवी.. महागड्या रिप्ड जीन्स विकत घेण्यापेक्षा जुन्या जीन्सला नवा लूक दिलेलं कधीही चांगलंच आणि खिशासाठी परवडेबल.. 

 

कसा द्यायचा जीन्सला रिप्ड लूक ?
- घरच्या घरी जीन्सला रिप्ड लूक देणे अतिशय सोपे आहे.
- यासाठी आपल्याला कात्री, पेन्सिल आणि पिन किंवा प्लकर या गोष्टी लागणार आहेत.
- सगळ्यात आधी जीन्स जमिनीवर व्यवस्थित सरळ करून ठेवा.
- यानंतर आपल्याला जिथे जिन्स रिप्ड करायची आहे, त्या भागावर पेन्सिलीने मार्किंग करून घ्या. जिथे मार्किंग केले आहे, तेथे कार्डबोर्ड टाका. म्हणजे मग कट करताना जीन्सचा खालचा भागही कापला जाणार नाही.


- दोन्ही पायांवर अगदीच एक सारखेच आणि एकाच जागेवर रिप्ड असायला हवे, असे मुळीच नाही.
- त्यामुळे तुम्हाला जसे पाहिजे तसे मार्किंग करा. एकाच पायावर रिप्ड केले तरी चालेल.
- एका स्केलने जीन्सवर आडव्या रेघा मारा. तुम्हाला हव्या त्या लांबीच्या  ४ ते ५ रेघा चालतील.
- आता कात्रीने किंवा कटरने या रेघांवर कापा. कापल्यानंतर जे दोरे बाहेर आले, त्यातले उभे दोरे कापून घ्या आणि आडवे दोरे बाहेर करा.. 
- अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जीन्स रिप्ड करू शकता. 

 

Web Title: DIY tricks, how to make ripped jeans from your old jeans at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.