उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेत. या काळात शरीर प्रचंड डिहायड्रेट होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी व थंड पेय पितो. पण स्कीनचे काय? उन्हाळ्यात त्वचेला खूप हानी पोहचते. त्वचा टॅन होते, यासह त्वचेवर मुरूम व काळपट डाग पडण्याची शक्यता निर्माण होते.
त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी अनेक जण महागडे प्रॉडक्टसचा वापर करतात. पण महागडे प्रॉडक्टसपेक्षा आपण टरबूजचा वापर करून उत्तम फेसमास्क बनवू शकता. टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतात. यासह शरीरातील उष्णता कमी करण्याचे घटक असते, ज्यामुळे स्किन ग्लो करते(DIY watermelon face masks to get a bright and radiant skin).
५ चुकांमुळे कायमची थांबते केसांची वाढ, केस गळतात-विरळ होतात
टरबूज फेसपॅक लावण्याचे फायदे
टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे सुरकुत्या दूर होतात. त्यात असलेले लाइकोपीन त्वचेवरील चमक कायम ठेवते. टरबूजमध्ये भरपूर पाणी असल्याने, चेहरा आतून स्वच्छ व सर्व घाण दूर करते. तसेच त्वचेला आतून मॉइश्चरायझ करते. टरबूजचा फेसपॅक लावल्याने सुरकुत्या, काळे डाग, टॅनिंग यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
अती पिकलेली केळी फेकून न देता ४ प्रकारे वापरा, चेहरा दिसेल तुकतुकीत-चमकदार
टरबूज फेसपॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
टरबूज पल्प दोन ते तीन चमचे
मध एक चमचा
बेसन एक चमचा
पिंपल्स-दुखरे फोड-निस्तेज चेहरा? तुळशीची मुठभर पानं घ्या करा ४ उपाय, चेहरा उजळेल चटकन
हळद अर्धा टीस्पून
अशा पद्धतीने बनवा फेसपॅक
सर्वप्रथम एका भांड्यात टरबूजाचा पल्प घ्या. त्याच्या बिया काढून टाका. टरबूजाच्या पल्पमध्ये एक चमचा मध, चिमूटभर हळद, एक चमचा बेसन मिसळून पेस्ट तयार करा. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर, सामान्य पाण्याने आपली त्वचा धुवा. फेसपॅक काढल्यानंतर चेहरा मॉइश्चरायझ करा. हा पॅक आठवड्यातून ३ वेळा वापरा, यामुळे चेहरा ग्लो करेल.