Lokmat Sakhi >Beauty > केसांना द्या प्रोटीन बूस्टर डोस, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरी, हवे फक्त 5 पदार्थ

केसांना द्या प्रोटीन बूस्टर डोस, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरी, हवे फक्त 5 पदार्थ

पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेण्ट महागडी वाटत असली तरी ही ट्रीटमेण्ट घरातल्या घरात केवळ 5-6 घटकांचा वापर करुन अगदी स्वस्तात करता येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 04:34 PM2022-03-19T16:34:27+5:302022-03-19T16:43:48+5:30

पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेण्ट महागडी वाटत असली तरी ही ट्रीटमेण्ट घरातल्या घरात केवळ 5-6 घटकांचा वापर करुन अगदी स्वस्तात करता येते.

Do a parlor-like protein treatment at home, just 5 foods needed for protein hair treatment at home | केसांना द्या प्रोटीन बूस्टर डोस, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरी, हवे फक्त 5 पदार्थ

केसांना द्या प्रोटीन बूस्टर डोस, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरी, हवे फक्त 5 पदार्थ

Highlightsप्रोटीन हेअर मास्कमधील शिया बटरमुळे केसांना आर्द्रता मिळते आणि केस कोरडे पडत नाही.घरच्याघरी केसांना प्रोटीन ट्रीटमेण्ट दिल्यास त्यातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे केस मजबूत होतात. पार्लर आणि हेअर क्लिनिकच्या तुलनेत स्वस्तात घरच्याघरी परिणामकारक प्रोटीन ट्रीटमेण्ट करता येते. 

केसांची मुळं केसांच्या पोषणात महत्वाची भूमिका निभावतात. शरीरातील इतर कोणत्याही अवयवांप्रमाणे केसांची मुळं ही आहार आणि रक्तप्रवाह याद्वारे पोषण मिळवतात.केसांच्या पोषक घटक म्हणजे प्रोटीन. आहारातून प्रोटीनची कमतरता भासल्यास केस खराब होतात. ते कोरडे आणि निस्तेज होतात. यासाठी केसांना प्रोटीन सप्लिमेण्टसची गरज असते. ही प्रोटीन सप्लिमेण्टस प्रोटीन ट्रीटमेण्टद्वारे पुरवली जाते. गरोदर महिला, पीसीओएसचा त्रास असणाऱ्या महिला-मुली, बाळांतीण माता, थायराॅइड आणि हार्मोनल असंतुलनाची समस्या असणाऱ्यांना प्रथिनांची कमतरता भासते. त्याचा परिणाम त्यांच्या केसांवरही दिसून येतो. त्यांना केसांची प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आहारातल्या प्रथिनांसोबतच केसांची प्रोटीन ट्रीटमेण्ट करण्याची गरज असते.

Image: Google

अमीनो ॲसिड आणि केराटिन या दोन प्रथिनांद्वारे केस निर्मिती होते. पण ऊन, धूळ, रसायनं, प्रदूषण याच्या संपर्कानं केसातील प्रथिनं घटक कमी होवून केस खराब होतात. अशा केसांना पार्लर किंवा हेअर क्लिनिकमध्ये जावून  प्रोटिन ट्रीटमेण्टची गरज असते. पण ही ट्रीटमेण्ट महागडी असल्यानं ती करुन घ्यायची टाळाटाळ केली जाते. केसांची प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही आणि केस अजूनच खराब होतात.  पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेण्ट महागडी वाटत असली तरी ही ट्रीटमेण्ट घरातल्या घरात केवळ 5-6 घटकांचा वापर करुन अगदी स्वस्तात करता येते. शिया बटर, अंंडं, मध, दही, एरंडेल तेल, खोबरेल तेल  या घटकांचा वापर करुन केसांना केराटिन हा घटक पुरवता येऊन केसांचं पोषण करता येतं. या सहा घटकांचा  वापर करुन केस मजबूत करुन केसांची हरवलेली चमक पुन्हा आणता येते. 

Image: Google

कशी करायची घरच्याघरी प्रोटीन ट्रीटमेण्ट?

घरच्याघरी केसांची प्रोटीन ट्रीटमेण्ट करुन केसांच्या समस्या दूर करण्यासाठी 5 शिया बटरचे तुकडे, 1 अंडं, 5 मोठे चमचे एरंडेल तेल, 2 मोठे चमचे खोबऱ्याचं तेल, 1 कप दही आणि 1 मोठा चमचा मध घ्यावं. 

Image: Google

एका वाटीत खोबऱ्याचं तेल घेऊन ते अर्धा मिनिटं गरम करुन घ्यावं. एका दुसऱ्या भांड्यात शिया बटर घालावं. हे बटर गरम पाण्यात ठेवून विरघळून घ्यावं. मग खोबऱ्याचं तेल आणि शिया बटर एकत्र करावं. यात अंडं, एरंडेल तेल, खोबरेल तेल, दही आणि मध घालावं. सर्व मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. ब्लेण्डरनं हे मिश्रण फिरवून त्याची पेस्ट करुन घ्यावी.  ही क्रीमी पेस्ट केसांना आणि केसांच्या मुळांना हलका मसाज करत लावावी. केसांना पेस्ट लावून झाल्यावर शाॅवर कॅप  घालून केस झाकावेत. ही पेस्ट साधारणत: एक तास केसांवर राहू द्यावी. पेस्ट लावून झाल्यावर तासाभरानं केस थंडं पाण्यानं धुवावेत. रुमालानं टिपून घ्यावेत. 

केसांना हा प्रोटीन हेअर मास्क लावताना केसांना तो जास्त होणार नाही अशा पध्दतीनं लावावा. कारण जास्त प्रमाणात प्रोटीन हेअर पॅक लावला तरी केस कोरडे होतात. केसांची निरोगी वाढ होण्यासाठी महिन्यातून एकदा हा प्रोटीन हेअर मास्क केसांना लावण्याचा सल्ला हेअर एक्सपर्ट देतात. 

प्रोटीन हेअर मास्कचे फायदे काय?

घरच्याघरी केसांची प्रोटीन ट्रीटमेण्ट करताना जो प्रोटीन हेअर मास्क लावला जातो त्याचे अनेक फायदे होतात. 

1. प्रोटीन हेअर मास्कमधील शिया बटरमुळे केसांना आर्द्रता मिळते आणि केस कोरडे पडत नाही. 

2. ॲण्टिऑक्सिडण्ट आणि  इतर पोषक घटकांमुळे या मास्कचा उपयोग  केस मजबूत आणि आरोग्यदायी होण्यासाठी होतो. 

3, प्रोटीन हेअर मास्कमुळे केसांच्या सर्व समस्या दूर होवून केसांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होते. 

4. मास्कमधील मधामुळे केसांचा रुक्षपणा, केस गळती या समस्या सहज दूर होतात. 
 

Web Title: Do a parlor-like protein treatment at home, just 5 foods needed for protein hair treatment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.