Lokmat Sakhi >Beauty > गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

Do fairness creams actually work ?: जाहिराती पाहून अनेकजणी गोरं होण्याच्या क्रिम्स वापरतात, पण त्या वापरताना नक्की काय माहिती हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 08:52 AM2023-09-21T08:52:42+5:302023-09-21T09:08:09+5:30

Do fairness creams actually work ?: जाहिराती पाहून अनेकजणी गोरं होण्याच्या क्रिम्स वापरतात, पण त्या वापरताना नक्की काय माहिती हवे...

Do fairness creams that claim to lighten the complexion if used daily ? | गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

फेअरनेस क्रिम्स लावून आपण गोरे होऊ शकतो का ? 

- लीना खांडेकर, ब्यूटी एक्स्पर्ट.

"पी हळद अन हो गोरी..." अशी जुनी म्हणं आपल्याकडे फारच प्रसिद्ध आहे. परंतु बदलत्या काळानुसार आजकाल आपण त्वचेच्या सौंदर्यासाठी महागड्या क्रिम्स, लोशन किंवा अनेक ट्रिटमेंट्स करून घेतो, तेव्हा रिझल्ट लगेच मिळावा अशी अपेक्षा असते.  आपला रंग उजळ करून देण्याऱ्या अनेक क्रिम्स बाजारांत उपलब्ध असल्या तरीही त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे असते. रंग उजळ करण्याच्या अनेक क्रिम्स व ट्रिटमेंट्स सध्या बाजारांत उपलब्ध असल्या तरीही या योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच कराव्यात. इतकेच नव्हे तर या क्रिम्स किंवा ट्रिटमेंट्स करून झाल्यानंतर त्वचेची योग्य रीतीने काळजी घेणं देखील तितकेच महत्वाचे असते. जर आपण या ट्रिटमेंटस करून योग्य ती काळजी (Is Fairness cream good or bad for you?) घेतली नाही तर याचे आपल्या त्वचेवर उलट परिणाम पाहायला मिळतात. अशा गोरं होण्याच्या क्रिम्स वापरल्याने आपण खरंच गोरं होतो का  ? रंग गोरा करून देणाऱ्या या फेअरनेस क्रिम्सचा वापर करणे कितपत योग्य आहे ? (Do fairness creams really work? ).

दिवसभर ए.सी मध्ये बसता, ५ टिप्स - कोरडी - निस्तेज तर नाही झाली तुमची त्वचा ?

फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...

सगळ्यांतआधी हे लक्षात ठेवायला हवे की "नथिंग इज पर्मनंट". त्वचा हा सगळ्यात नाजूक विषय आहे. आपली त्वचा ही एखाद्या लहान बाळासारखी असते. सर्वांनाच आपली त्वचा नितळ, गोरी, ताजीतवानी, चमकदार असावी असे वाटत असते. पण म्हणून यासाठी त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या फेअरनेस क्रिम्स वापरणे संपूर्णपणे योग्य आहेच असे नाही(Do fairness creams that claim to lighten the complexion if used daily?)

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

काखेत खूप डिओ मारल्यानं त्वचा काळी पडली आहे ? १ सोपा उपाय, काळेपणासह दुर्गंधीही होईल कमी...

फेअरनेस क्रिम्स आपल्या त्वचेचा रंग उजळ करण्यात एका ठराविक मर्यादेपर्यंतच काम करु शकता. आपल्या त्वचेचा मूळ रंग हा आपल्याला अनुवंशिकतेप्रमाणे प्राप्त झालेला असतो, त्यात आपण फारसा बदल करु शकत नाही. जर काही कारणास्तव जसे की उन्हामुळे, अयोग्य जीवनशैली किंवा काही मेडिकल कंडिशन यामुळे जर आपल्या रंगात काही फरक पडला असेल तर काही क्रिम्स किंवा ट्रिटमेंट्स करून एका ठराविक मर्यादेपर्यंतच आपण आपला रंग पुन्हा पहिल्यासारखा करु शकतो. याउलट फेअरनेस क्रिम्स किंवा काही ट्रिटमेंट्स घेऊन आपण आपला रंग गोरा करु शकतो असे काहीच नसते. 

फेअरनेस क्रिम्स नक्की काय काम करतात ? 

फेअरनेस क्रिम्सचा वापर केल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचा बचाव केला जातो. तसेच या क्रिम्सचा वापर केल्याने मेलेनिनचा स्राव रोखला जातो, अशा प्रकारे टॅन कमी करण्यात आणि नैसर्गिक त्वचेचा पोत तसेच रंग थोड्याफार प्रमाणात उजळ करण्यात मदत होते. आपल्या त्वचेचा रंग हा नैसर्गिक असतो. त्यामुळे तो बदलण्याचा प्रयत्न करू नये. जास्त क्रिमचा वापर हा आपल्याला वेळेपूर्वीच म्हातारे दिसण्यात भाग पाडू शकतो. अथवा त्वचा ख़राब करु शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा पोत व प्रकार ओळखूनच मग त्या प्रमाणे योग्य प्रॉडक्ट्स वापरा, मॅन्युफॅक्चरिंगच्या सूचना नीट वाचा. बाजारातील आकर्षक जाहिरातींना बळी न पडता आपण जसे आहोत, तसा स्वतःचा स्वीकार करावा. नैसर्गिक सौंदर्य खुलवण्यासाठी निरोगी आहार, व्यवस्थित झोप आणि व्यायाम यांची मदत नक्कीच घ्या. यासोबतच योग्य तज्ज्ञांचा सल्लाही घ्या.  

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

लीना खांडेकर

संचालिका 

लीज ब्यूटी सेंटर आणि स्पा

leesspa@gmail.com

Web Title: Do fairness creams that claim to lighten the complexion if used daily ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.