Perfume Side Effects : परफ्यूमचा वापर करणं आज स्टाइल स्टेटमेंट झालं आहे. पर्सनॅलिटी सुधारण्यासाठी आणि घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आज सगळेच परफ्यूमचा भरपूर वापर करतात. प्रत्येकाला आपल्या परफ्यूमच्या माध्यमातून दुसऱ्यांवर छाप सोडायची असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुम्ही वापरत असलेल्या परफ्यूममध्ये अनेक घातक केमिकल्स असतात, जे तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करतात.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे की, परफ्यूममध्ये वापरले जाणारे फथॅलेट्स आणि सिंथेटिकमुळं त्वचेचं नुकसान तर होतंच, सोबतच संपूर्ण शरीरासाठीही नुकसानकारक असतात. फथॅलेट्ससारख्या केमिकल्सला एंडोक्राइन डिसरप्टर्स असंही म्हटलं जातं. जे तुमच्या हार्मोन्सला नुकसान पोहोचवू शकतात. या केमिकल्समुळे त्वचेवर जळजळ, एलर्जी आणि रॅशेज येऊ शकतात. नेहमीच यांचा वापर केल्यानं तुमची इम्यूनिटी कमजोर होऊ शकते आणि कॅन्सरसारख्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.
काय सांगतो रिसर्च?
एक्सपर्ट सांगतात की, परफ्यूममध्ये असलेले वोलाटाइल ऑर्गॅनिक तत्व हवेत मिक्स होऊन, श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. यामुळे अस्थमा, डोकेदुखी आणि हृदयासंबंधी समस्यांचा धोका असतो. त्याशिवाय या केमिकल्सचा प्रभाव महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही पडू शकतो.
कोणते परफ्यूम अधिक घातक?
स्वस्त आणि लोकल ब्रॅन्डच्या परफ्यूममध्ये नुकसानकारक केमिकल्सचं प्रमाण अधिक असतं. यांच्यापासून बचाव करणं गरजेचं आहे. अनेक महागडे ब्रॅन्डही सुरक्षित नसतात. कारण यांमध्ये सिंथेटिक सुगंध आणि केमिकल्सचा वापर केला जातो.
कसा कराल बचाव?
- सुगंधासाठी नॅचरल प्रोडक्ट्सचा वापर करा. अशा परफ्यूमची निवड करा जे नॅचरल ऑइल आणि फुलांच्या अर्कापासून तयार करण्यात आले आहेत.
- परफ्यूम खूप जास्त लावू नका. थोड्या प्रमाणात लावूनही तुमचं काम होऊ शकतं.
- परफ्यूम खरेदी करण्याआधी त्यावरील लेबल वाचा. त्यात फथॅलेट्स, पॅराबेन्स किंवा VOCs सारखे केमिकल्स असतील तर ते घेऊ नका.
- बंद रूममध्ये परफ्यूमचा वापर केल्यास वायुप्रदूषण वाढतं. अशात मोकळ्या जागेवर याचा वापर करावा.