Mistake to Avoid When Coloring Your Hair: मुलायम, लांब आणि चमकदार केस कुणाच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करत असतात. मात्र, आजकाल वाढतं प्रदूषण, तापमान, पोषणाची कमतरता किंवा काही आजार यामुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या होत आहेत. त्यात बरेचजण केसांचं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी हेअर डाय लावतात. लूक वेगळा दिसावा यासाठी लोक केसांवर वेगवेगळे कलर लावतात. या कलर केलेल्या केसांमुळे स्टायलिश लूक मिळतो, पण हेअर डाय करताना काही गोष्टींची काळजी घेतली गेली नाही तर केसांचं नुकसानही होतं. एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला केसगळती, केस तुटणे अशा समस्या होऊ शकतात. अशात तुम्ही सुद्धा हेअर डाय करत असाल तर कोणती चूक करू नये हे जाणून घेऊया.
काय सांगतात एक्सपर्ट?
प्रसिद्ध सेलिब्रिटी डर्मेटोलॉजिस्ट रश्मि शेट्टी यांनी प्रसिद्ध एंटरप्रेन्योर रणवीर इलाहाबादियाच्या एका पॉडकास्टमध्ये याबाबत माहिती दिली. हेअर कलरच्या साइड इफेक्टबाबत त्यांनी यावेळी काही गोष्टी सांगितल्या. रश्मि शेट्टी म्हणाल्या की, 'हेअर डाय करणं चुकीचं नाही. पण यासाठी योग्य शेड निवडणं फार गरजेचं असतं'.
डॉ. शेट्टी यांच्यानुसार, 'जेव्हा कधी तुम्ही हेअर डाय करणार असाल तेव्हा नेहमीच केसांच्या रंगापेक्षा डार्क शेडची निवड करा. कधीच लाइट शेडची निवड करू नका. कारण केसांवर लाइट शेडचं डाय लावल्यानं केसांचा डायमीटर कमी होतो. ज्यामुळे केस पातळ होतात किंवा खूप जास्त तुटू लागतात'.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, नेहमीच लोकांची तक्रार असते की, त्यांचे केस आधी खूप दाट होते. पण हेअर डाय लावल्यानंतर केस कमी झालेत किंवा पातळ झालेत. तसेच केसगळतीही वाढली. या समस्या लाइट हेअर डायचा वापर केल्यानं होतात. त्यामुळे नेहमी केसांच्या कलरच्या एक ते दोन शेड डार्क हेअर डाय वापरा. यानं तुमचा लूकही चेंज होईल आणि सोबतच केसही हेल्दी राहतील.