आजकाल आपले केस दाट, सरळ दिसावेत यासाठी अनेक मुली स्ट्रेटनिंग, रिबाऊंडींग, स्मूथनिंग, प्रोटीन ट्रिटमेंट, केरेटीन ट्रिटमेंट करतात. ही ट्रिटमेंट केल्यानंतर केस नेहमीपेक्षा जास्त आणि सुंदर दिसू लागतात. याशिवाय केसांमध्ये सतत गुंताही होत नाही. (Do Not These Things After Smoothing) केसांवर या महागड्या ट्रिटमेंट्स घेतल्यानंतर काळजीसुद्धा तितकीच घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली नाही तर केस गळण्याची समस्या अधिक वाढू लागते. (Hair Care Tips)
स्मूदनिंग केल्यानंतर केल्यानंतर केसांना तेल लावावे की लावू नये, तेल लावण्याची वारंवारता किती असावी असे प्रश्न अनेकांना पडतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Jawed Habib Tips How To Take care Of Hairs After Smoothing)
जावेद हबीब सांगतात की स्मूदनिंग केल्यानंतर २ आठवड्यानंतर तुम्ही केसांना तेल लावू शकता. शॅम्पूने केस धुण्याच्या १० मिनिटं आधी हलक्या हाताने केसांना तेल लावावे. केसांसाठी बदामाचे आणि नारळाचे तेल उत्तम ठरते. तुम्ही बदामाचे आणि नारळाचे तेल एका वाटीत एकत्र करून घ्या मग केसांना लावा.
1) केसांना रिबाऊंडींग केल्यानंतर ३ दिवस केस ओले करू नका. ३ दिवसांनंतर पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन प्रोफेशनल्सकडून हेअर वॉश घ्या.
पफ स्लिव्हजचे १० नविन ब्लाऊज पॅटर्न्स; फुग्यांच्या बाह्यांची नवीन स्टाईल देईल मॉडर्न लूक
२) केस रबरबॅण्ड किंवा क्लिपनं बांधणं सोडा, केस मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि केस ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित विंचरा.
३) घरी केस धुवायला सुरूवात केल्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर योग्य प्रतीचा असावा. साधा शॅम्पू वापरल्यास स्मूथनिंग केलेले केस लवकर खराब होऊ शकतात.
४) केस वाढल्यानंतर केसांना फाटे फुटले असतील तर केस ट्रिम करायला विसरू नका. केसांवर गरम पाण्याचा वापर करू नका. महिन्यातून एकदा केसांना हेअर स्पा, हेअर वॉश सलूनमध्ये करून घ्या.
पोट फुगतं- गॅस पासही होत नाही? या २ पदार्थांचे पाणी प्या, पोटाच्या अनेक त्रासांवर सोपे घरगुती उपाय
५) केसांवर हेअर सिरम वापरून नंतर ब्रशनं विंचरा. केस धुण्याच्या ५ मिनिटं आधी केसांना एलोवेरा जेल लावून या जेलनं मसाज करा. केसांना कोरडेपणा येऊ नये यासाठी सतत हेअर स्ट्रेनर वापरणं टाळा.