बटाट्याचा उपयोग खाण्यासाठी किंवा सौंदर्यासाठी करताना प्रामुख्याने बटाट्याची सालं काढून टाकली जातात. बटाट्याची सालं काढून टाकून देणं म्हणजे बटाट्यातील अर्धं पोषणमूल्य घालवण्यासारखं आहे. जितकं सत्त्वं आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने बटाट्यात असतं, तितकंच बटाट्यांच्या सालातही. बटाट्याच्या सालांचा उपयोग करुन कठीण सौंदर्यसमस्यांवरही घरच्याघरी सहज उपाय करता येतात.
Image: Google
बटाट्याच्या सालांमध्ये ब, क ही जीवनसत्वं, लोह, पोटॅशियम ही खनिजं असतात. सूज आणि दाह याच्याशी लढणारे महत्त्वाचे फ्लेवोनाॅइडस हे फायटोन्यूट्रीएण्ट बटाट्याच्या सालात असतात. ते ॲण्टिऑक्सिडण्टसारखे काम करतात. यामुळे बटाट्याची सालं वापरुन त्वचेचं संरक्षण करता येतं. चेहरा उजळण्यासाठी, उन्हानं चेहऱ्यावर आलेला काळपटपणा घालवण्यासाठी, मुरुम पुटकुळ्यांवर उपचार म्हणून, ब्लॅकहेडस, व्हाइटहेडस घालवण्यासाठी बटाट्याच्या सालांचा उपयोग करता येतो. बटाट्याच्या सालांचा विविध पध्दतीनं सौंदर्यासाठी उपयोग करता येतो. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी बटाट्याच्या सालांचा उपयोग होतो.
Image: Google
1. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बटाट्याच्या सालांचा उपयोग होतो. बटाट्याच्या सालांमधील गुणधर्म सालं ॲण्टि एजंट म्हणूनही काम करतात. यासाठी बटाटा आधी धुवून घ्यावा. बटाट्याची सालं काढावीत. ती मिक्सरमधून वाटून घ्यावीत. ही पेस्ट एका वाटीत काढून त्यात थोड दही आणि मध घालावं. ते चांगलं एकजीव करुन घ्यावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावाव्ं. चेहरा 15 मिनिटांनी पाण्यानं धुवावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास त्वचा तरुण राहाते.
Image: Google
2. तेलकट त्वचा खराब होण्याचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात तर हा धोका आणखी वाढतो. त्वचेवरील जास्तीची तेल निर्मिती नियंत्रित करण्यासाठी बटाट्याच्या सालांचा उपयोग करता येतो. यासाठी बटाटा धुवून बटाट्यची सालं काढावीत. ही सालं मिक्सरमध्ये वाटावीत. या पेस्टमध्ये थोडं लिंबू पिळून ते बटाट्याच्या सालांच्या पेस्टमध्ये चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर ठेवून मग चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. आठवड्यातून 3- 4 वेळा हा उपाय केल्यास तेलकट त्वचेला फायदा मिळतो. या उपायानं मुरुम पुटकुळ्यांची समस्याही बरी होते.
Image: Google
3. काळे डाग, डोळ्यांखालील सूज यावर बटाट्याच्या सालांचा उपयोग करता येतो. यासाठी बटाटा धुवून् घ्यावा. बटाट्याची सालं काढावीत. ती थोड्यावेळ फ्रिजमध्ये ठेवून् थंडं करावीत. मग ही सालं डोळ्यांच्या खाली किंवा चेहऱ्यावर जिथे काळे डाग आहेत तिथे ठेवावीत. काळे डाग निघून जातात आणि सूजही कमी होते. तसेच उन्हानं त्वचा काळवंडली असल्यास बटाट्याची सालं फ्रिजमध्ये ठेवून गार करावीत. नंतर ही सालं चेहऱ्यावर हलका मसाज करत घासावीत. थोडा वेळान चेहरा थंडं पाण्यानं धुवावा.
Image: Google
4 . बटाट्याच्या सालांचा उपयोग केस वाढण्यासाठीही करत येतो. यासाठी बटाटा धुवून त्याची सालं काढावीत. ती मिक्सरमधून वाटून घ्यावीत. ही पेस्ट केसांच्या मुळांना हलका मसाज करत लावावी. मसाज 5-10 मिनिटं करावा. नंतर अर्ध्या तासानं केस कोमट पाण्यानं धुवावेत. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केस चांगले