महिलांची आवडती गोष्ट म्हणजे मेकअप. कोणताही प्रोग्राम असो या फंक्शन महिला मेकअप टच केल्याशिवाय कुठे जात नाहीत. मेकअपमुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. मेकअपमध्ये महिलांना लिपस्टिक लावायला फार आवडते. लिपस्टिकशिवाय मेकअप लूक पूर्ण होत नाही. काही महिला लिपस्टिकचा वापर चेहऱ्यावर ब्लश म्हणून देखील करतात. तर काही आयशॅडो म्हणून देखील करतात. याने पिंक शेड चेहऱ्यावर येतो यासह चेहरा सुंदर दिसतो.
मात्र, लिपस्टिकचा अधिक वापर केल्याने ओठ काळपट पडतात. ज्याप्रमाणे ओठ काळपट पडतात, त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यासाठी लिपस्टिक हानिकारक मानले गेले आहे. यासंदर्भात त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर जुशया भाटिया सारीन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी त्वचेवर लिपस्टिक लावण्याचे काही दुष्परिणाम सांगितले आहे.
लिपस्टिक चेहऱ्यावर का लावू नये
बहुतांश महिला लिपस्टिकचा वापर चेहऱ्यावर टिंट म्हणून करतात. हा हॅक अनेकांनी करून पाहिलाच असेल. मात्र, हा पॉकेट फ्रेंडली हॅक चेहऱ्यासाठी हानिकारक ठरत आहे. आपल्या ओठांची आणि चेहऱ्याची त्वचा अत्यंत कोमल आणि नाजूक असते. त्यावर लिपस्टिकचा दुष्परिणाम हा होतोच. गडद रंगाच्या लिपस्टिकमध्ये मेटल ऑक्साइड आढळते. ज्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या आतील त्वचेपर्यंत होतो. त्यामुळे लिपस्टिक अधिक वेळ चेहऱ्यावर अथवा ओठांवर लावून ठेऊ नये. चेहऱ्यावर लिपस्टिक लावल्याने त्वचेचा रंग हा फिका पडत जातो. ज्यामुळे त्वचेचा रंग मंदावतो.
आपण बहुतांश वेळा चेहऱ्यावर लिपस्टिक लावून ब्लश करतो, अशा परिस्थितीत त्वचेची छिद्रे बंद होतात आणि त्वचेवर पिंपल्स, मुरूम उठण्याची समस्या निर्माण होते. काही लिपस्टिक केमिकलयुक्त असल्यामुळे चेहऱ्यावर थेट परिणाम करतात. ज्यामुळे त्वचेवर डाग, पिगमेंटेशन अशा समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी लिपस्टिक लावताना हलक्या रंगाच्या लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न करा. न्यूड अथवा हलक्या रंगाच्या लिपस्टिकमुळे त्वचेला हानी पोहचत नाही.