Join us

चेहर्‍याला सारखं गुलाबपाणी लावता? चेहरा होईल खराब, या ५ गोष्टी लक्षात ठेवाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2025 15:10 IST

rose water side effects: rose water side effects for face: rose water side effects on skin: how to use rose water for face: skin care tips: dry skin care: rose water toner: rose water: rose water drop daily use: तुम्ही रोज गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करत असाल तर त्यामुळे चेहर्‍याला नुकसान होऊ शकते.

चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा यासाठी आपण त्याच्यावर काही ना काही लावत असतो. (rose water side effects for face) चेहऱ्यावर कोणतेही फेसपॅक लावायचे असेल तर त्या हमखास गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाणी हे नैसर्गिक सौंदर्य उत्पादन आहे. जे त्वचेला टवटवीत ठेवण्यासह मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. गुलाब पाणी हे नैसर्गिक उत्पादन असून गुलाबाच्या पाकळ्यांवर प्रक्रिया करुन बनवले जाते. गुलाबाचा वापर हा फक्त त्वचेसाठी नाही तर डोळ्यांसाठी देखील केला जातो. (rose water side effects on skin)

गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि तिची नैसर्गिक चमक वाढविण्यास मदत करतात. (how to use rose water for face) तसेच डोळ्यांची जळजळ शांत करण्यासाठी, मुरुमांवर उपचार करण्यासाठी आणि त्वचेसाठी इतर अनेक फायदे देण्यासाठी याचा हमखास वापर केला जातो. परंतु, जर तुम्ही रोज गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करत असाल तर त्यामुळे चेहऱ्याला नुकसान होऊ शकते. त्याचा अतवापर त्वचेवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया. 

1. त्वचा कोरडी पडणे

गुलाब पाण्याचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्वचा कोरडी पडते. जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल आणि गुलाब पाणी लावल्यास त्वचेतील तेल निघून जाईल. ज्यामुळे त्वचेवरील ओलावा कमी होईल. 

2. ऍलर्जी होण्याची शक्यता

गुलाब पाणी हे नैसर्गिक पदार्थ आहे. पण यात असणाऱ्या घटकांमुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. त्याच्या जास्त वापरामुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. जर तुमची त्वचा संवेदनशील असल्यास गुलाब पाण्याचा वापर शक्यतो कमी करावा. 

3. मुरुमे आणि खुणा 

जास्त गुलाब पाण्याचा वापर केल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होतात. ज्यामुळे मुरुमे आणि पुरळ येतात. गुलाब पाणी त्वचेसाठी योग्य नसलेल्या घटकांमध्ये मिसळले जाते. तेव्हा त्वचेचे संतुलन बिघडून समस्या वाढतात. 

4. त्वचेचे असंतुलन

गुलाब पाण्याचा जास्त वापर त्वचेच्या नैसर्गिक पीएच पातळीला असंतुलित करतो. ज्यामुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे किंवा पुरळ येऊ शकते. गुलाब पाण्याचा वापर त्वचेवर संतुलित प्रमाणात करा. 

5. योग्य प्रमाणात गुलाब पाण्याचा वापर 

त्वचेवर गुलाब जल किती प्रमाणात लावायचे हे सांगणं कठीण आहे. परंतु, हलक्या हाताने याचा त्वचेवर वापर करावा. सामान्य प्रमाणात २ ते ३ थेंब त्वचेसाठी पुरेसे आहे. यापेक्षा जास्त चेहऱ्यावर याचा वापर करु नका.      

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी