Join us  

सलूनमध्ये किंवा घरात सर्रास हेअर ड्रायर, ब्लो ड्रायर वापरता? धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, ३ गोष्टी लक्षात ठेवाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 3:31 PM

Hair Dryer Blasts Due to Short Circuit How to Take Care : ड्रायर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी...

ठळक मुद्देअग्निशमन उपकरणे असणे आवश्यक आहे. त्यामुळे गंभीर स्थिती उद्भवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.  कोणत्याही उपकरणांची वेळच्या वेळी देखभाल केलेली चांगली.

कधी पटकन एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हणून केस वाळवण्यासाठी तर कधी हेअर सेटींगसाठी आपण सर्रास हेअर ड्रायर वापरतो. हेअर ड्रायर किंवा ब्लो ड्रायर एखादवेळी वापरणे ठिक पण नियमित अशाप्रकारच्या उपकरणांचा वापर करणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसते हे आपण ऐकून आहोत. आता हे झाले केसांच्या आरोग्याविषयी. पण हाच हेअर ड्रायर आपल्या जीवावर बेतला तर? आता असे का, हा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर एका सलूनमध्ये केस कापताना हेअर ड्रायर वापरताना त्याचा अचानक स्फोट झाला. ही घटना नेमकी कुठे घडली याबाबत माहिती मिळाली नसली तरी ड्रायर सुरू केल्यानंतर त्यातून आग बाहेर आल्याचे आणि त्यामुळे ग्राहकाच्या भोवती आगीचे वेढे असल्याचे दिसते. ड्रायरमधून आग बाहेर आली त्यावेळी केस कापणाऱ्याने तिथून पळ काढला मात्र ग्राहकाच्या ते जीवावर बेतणारे ठरले. सोशल मीडियावर काही वेळात हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला असून ड्रायर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहूया (Hair Dryer Blasts Due to Short Circuit How to Take Care)...

(Image : Google)

१. वायरींग तपासायला हवे

अनेकदा आपण घरी ड्रायरसारख्या गोष्टी अगदी सहज वापरतो. अनेकींसाठी तर हा रुटीनचा भाग असतो. असे असले तरी आपल्या घरातील वायरींग योग्य आहे ना याची तपासणी ठराविक काळाने करायला हवी. फक्त या गोष्टीसाठीच नाही तर एकूण सर्वच प्रकारच्या इलोक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ते फायदेशीर ठरु शकते. 

२. उपकरणे किती जुनी याचा अंदाज घ्यावा

जी उपकरणे थेट आपल्या शरीराशी संबंधित आहेत ती उपकरणे जास्त जुनी झाली की एकतर बदलावीत किंवा त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करुन घ्यावी. काही वेळा उपकरणे जास्त जुनी झाली तर त्यामध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून कोणत्याही उपकरणांची वेळच्या वेळी देखभाल केलेली चांगली.

३. अग्निशमन उपकरणे 

कधी गॅसच्या स्फोटामुळे, तर कधी पेटत्या दिव्यामुळे, इलेक्ट्रॉनिक वस्तुंमुळे घरात, ऑफीसमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. अशावेळी याठिकाणी अग्निशमन उपकरणे असणे आवश्यक आहे. त्यामुळे गंभीर स्थिती उद्भवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स