महिलांना पुरूषांप्रमाणे दाढी मिशी जरी येत नसली तरी, चेहर्यावर बारीक केस असतात. अप्पर लिप्स तर असतातच आणि महिला वेळोवेळी ते केस साफही करतात. (Do you have hair on your chin as well as cheeks? Check out these 4 ways to remove facial hair)वॅक्सने काढतात किंवा पार्लरमध्ये जाऊन अप्पर लिप्स स्थ्रेडींग करून घेतात. पण बाकी चेहर्यावरही असे केस असतात. जे उन्हात किंवा उजेडात दिसून येतात. हनुवटीवरही बारीक केस असतात. खरं तर शरीरावरील केस ही लाज वाटण्याची बाब नाही. ती नैसर्गिक ठेवण असते.(Do you have hair on your chin as well as cheeks? Check out these 4 ways to remove facial hair)
प्रत्येक महिलेला असे केस असतात. डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणतात, "काही महिलांचे हार्मोनल संतुलन व्यवस्थित नसल्याने त्यांच्या चेहर्यावरील केसांचे प्रमाण जास्त असते." पण महिलांना त्या केसांबरोबर फिरायला कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे त्या विविध प्रयोग करून बघतात.
असे प्रयोग करण्यापेक्षा काही साधे नैसर्गिक उपाय आहेत ते करा. त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रासही होणार नाही.
१.एका वाटीमध्ये २ चमचे हळद घ्या. त्यामध्ये ३ चमचे बेसन घाला. अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये पिळा. २ चिमटी चंदनाची पूड घाला. सगळं मिक्स करा. पेस्ट करण्यापुरते पाणी घाला. चेहर्याला लावा आणि किमान २० मिनिटे तरी ठेवा. एक महिनाभर सलग ही पेस्ट वापरली की, मग चेहर्यावरील केसांचे प्रमाण कमी व्हायला सुरवात होईल.
२. या केसांची वाढ होते कारण शरीरातील हार्मोनल बॅलेंन्स नीट नसतो. तो सुरळीत व्हावा यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हार्मोनल संतुलन चांगले असेल तर, ही समस्या उद्भवणारच नाही. जसे की सोया बेस प्रॉडक्ट्स, डाळी, कडधान्ये, गहू आदी. आहारात घ्यावे.
३. साखर, लिंबाचा रस, दोन चमचे बेसन मिक्स करून चेहरा स्क्रब करायचा. साखर ही नैसर्गिक हेअर रीमूव्हर आहे. तिच्या सततच्या वापराने चेहर्यावरील केस हळूहळू निघून जातील.
४. जर तरीही तुमच्या चेहर्यावर भरपूर केस येतच असतील तर, स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन या. चेहरा दिसायला कसा दिसतो त्यापेक्षा त्यामागे काही गंभीर समस्या नाही ना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.