Join us  

खूप घाम आल्याने अंगाला खाज सुटते? ३ उपाय- खाज येणं होईल कमी चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 7:14 PM

Do you itch a lot due to sweating? Here's how to stop उकाडा, सतत घाम, यामुळे त्वचेवर रॅश येते, खाज सुटते त्याकडे दुर्लक्ष करु नका.

उन्हाच्या झळा लागल्यानंतर जीव कासावीस होतो. शरीराला थंडावा देण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो.  उन्हाळ्यात मुख्य म्हणजे शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीरातून प्रचंड घाम निघतो, घाम त्वचेवर सुकल्यानंतर खाज - जळजळ येण्याची समस्या निर्माण होते.

त्वचेवर येणारी खाज व घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकते. यासह स्किन इन्फेक्शनची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात स्किनची काळजी घेणं आवश्यक आहे. त्वचेतील खाज कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. या उपायांमुळे खाजेची समस्या नक्की सुटेल(Do you itch a lot due to sweating? Here's how to stop).

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा

खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर, कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ करा. कडूलिंबात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीरातील खाज येण्याची समस्या दूर करतात. या पाण्याने आंघोळ केल्याने पुरळ, त्वचेवर फंगस निर्माण होणाऱ्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

केस गळतीने वैतागून रडकुंडीला आला असाल तर करा १ चमचा अळीवाचा सोपा उपाय, फायदेच फायदे

कडूलिंबाचे पाने कसे वापराल

सर्वप्रथम, कडूलिंबाची पाने स्वच्छ पाण्याने धुवा. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडूलिंबाची काही पाने टाकून उकळवत ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यातील पाने काढा, व हे पाणी कोमट झाल्यानंतर आंघोळ करा. या पाण्याने आंघोळ केल्यानंतर खाज येण्याची समस्या कमी होईल.

खोबरेल तेलाने करा मसाज

अनेकदा स्किन ड्राय असल्यामुळे खाज येण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी संपूर्ण शरीराला खोबरेल तेलाने मसाज करा आणि त्वचेला मॉइश्चरायझ करा. असे केल्याने त्वचेवर खाज येण्याची समस्या कमी होईल. यासोबतच त्वचा चमकदार दिसेल. आपण आठवड्यातून दोनदा खोबरेल तेलाने मसाज करू शकता.

फक्त दोन तासात आणि मोफत ‘हेअर स्मुथनिंग’ करायचंय का? हा घ्या भन्नाट उपाय

सैल कपडे परिधान करा

अनेकदा टाईट कपड्यांमुळेही अंगावर खाज येण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात शक्यतो सैल कपडे घाला. यामुळे शरीरावर कमी घाम येईल, तसेच खाज येण्याची समस्याही कमी होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी