Join us  

सध्याचा जबरदस्त ब्यूटी ट्रेण्ड 'स्किन सायकलिंग' माहितीये? बघा कसं करायचं आणि काय त्याचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 5:01 PM

Benefits of skin cycling: सध्या सोशल मिडियावर स्किन सायकलिंग हा ब्यूटी ट्रेण्ड जबरदस्त व्हायरल होत आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यात नेमकं काय करायचं असतं आणि कशासाठी?

ठळक मुद्दे४ दिवस झाले की पुन्हा पहिल्यापासून पुढच्या ४ दिवसांसाठी हे रुटीन सुरू करायचं. स्किन सायकलिंग ट्रिटमेंटमुळे त्वचा चमकदार होते.

नेहमी एकच एक प्रकारचं स्किनकेअर रुटीन जर आपण करत राहिलो, तर हळूहळू त्याचा त्वचेवर म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. कारण त्वचेलाही दरवेळी काहीतरी वेगळं पोषण पाहिजे असतं. त्यामुळेच त्वचेला  आलटून- पालटून असं वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न म्हणजेच स्किन सायकलिंग (Benefits of skin cycling) होय. यात प्रामुख्याने नाईट स्किन केअर रुटीनवर भर दिलेला आहे. रात्री झोपण्यापुर्वी स्किन सायकलिंग करावी. ही एकूण ४ दिवसांची प्रक्रिया असून या चारही दिवसांमध्ये त्वचेची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते (What is skin cycling?). ४ दिवस झाले की पुन्हा पहिल्यापासून पुढच्या ४ दिवसांसाठी हे रुटीन सुरू करायचं. स्किन सायकलिंग (skin cycling) ट्रिटमेंटमुळे त्वचा चमकदार होते.

कसं करायचं स्किन सायकलिंग?१. एक्सफोलिएशनही स्किन सायकलिंग प्रक्रियेतली सगळ्यात पहिली क्रिया आहे. झोपण्यापुर्वी एकदा चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर त्वचेला एक्सफोलिएटींग क्रिम किंवा पिलींग क्रिम लावून मसाज करावा.

बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली

त्यानंतर पुन्हा त्वचेला मॉईश्चराईज करावे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी त्या क्रिमचे ४ ते ५ थेंब पुरेसे आहेत.

 

२. रेटिनॉल ट्रिटमेंटत्वचा एक्सफोलिएट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्वचेसाठी रेटिनॉल ट्रिटमेंट द्यावी. यासाठीचेही अनेक कॉस्मेटिक्स बाजारात उपलब्ध आहेत. रेटिनॉल ट्रिटमेंट दिल्यानंतर त्वचा मॉईश्चराईज करावी. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन ए मिळते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 

झोपण्यापुर्वी दूध घेणं सर्वांसाठीच फायदेशीर असतं? कुणी घ्यावं- कुणी टाळावं? तज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या गोष्टी 

३. हायड्रेशनतिसऱ्या दिवशी त्वचेला हायड्रेटेड ठेवावं. यासाठी योग्य ते हायड्रेटींग सिरम निवडून त्याने त्वचेला मसाज करावी. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही, डल होत नाही.

 

४. माॅईश्चरायजरचौथ्या दिवशी रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवावा आणि त्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करावे. वरीलपैकी जे प्रोडक्ट तुम्ही नव्याने वापरणार असाल, त्याची आधी पॅचटेस्ट घ्या. ते कॉस्मेटिक त्वचेला सूट होत आहे की नाही हे तपासा आणि त्यानंतरच सगळ्या त्वचेवर लावा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी