कडक्याच्या उन्हात घरातून बाहेर पडल्यावर भयंकर गरम होऊ लागते आणि त्वचेची आग होऊन त्वचा काळी पडू लागते. उन्हामधील हानिकारक युवी किरणे तुमच्या त्वचेचे आरोग्य संमपूर्णपणे बिघडवू शकतात आणि त्वचेला ड्राय बनवतात. म्हणूनच उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे आवश्यक ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेला अधिक चांगल्या प्रकारे जपावे लागते. जरी आपण उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, सनग्लासेस आणि मास्क वापरत असलो तरी सुद्धा आपण अजून काळजी घेणे गरजेचे असते.
उन्हाळ्यामध्ये त्वचेचे चांगले संरक्षण करण्याकरता सनस्क्रीन शिवाय दुसरा चांगला पर्याय कोणता असूच शकत नाही. सुर्यप्रकाशातून प्रसारित होणारी अतिनील किरणं त्वचेसाठी हानिकारक असतात. या किरणांमुळे त्वचेचे आजार आणि सनबर्न होण्याची शक्यता असते. यासाठीच डॉक्टर आणि ब्युटी एक्सपर्ट्स सुर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतात. आपण शक्यतो प्रखर उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतो. परंतु उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावण्यासोबतच काहीजण घरात असताना देखील सनस्क्रीनचा वापर करतात. हे योग्य आहे की अयोग्य, पाहुयात एक्स्पर्ट काय सांगतात(Is sunscreen still necessary when you're working from home?).
सनस्क्रीन लावणे का आवश्यक आहे ?
भर रणरणत्या उन्हांत त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर करणे हे अतिशय गरजेचे असते. आपल्या देशात सूर्याची किरणे ही सरळ रेषेत आणि तीव्र स्वरुपात पडतात. शिवाय आपल्याकडे प्रदूषणाचे प्रमाण ही जास्त आहे. तीव्र उन्हामुळे आपल्याला सनबर्न, स्किन पिग्मेंटेशन, त्वचेचा कॅन्सर यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे सनस्क्रीन तुम्हाला यांसारख्या आजारांपासून वाचवू शकते.
उन्हाळ्यात काखेत खूप घाम येतो, दुर्गंधीही येते? त्याची कारणे ५ - पाहा कशी टाळता येतील...
आपल्या त्वचेला उन्हामुळे खूप त्रास होतो. त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा तुम्ही नेहमीच तुमच्याजवळ सनस्क्रीन लोशन ठेवले पाहिजे. तुम्ही जरी उन्हामध्ये घाम गाळत असाल किंवा समुद्र किनाऱ्यांवर आराम करत असाल तरी सुद्धा तुम्ही सनस्क्रीन लावणे हे गरजेचे आहे. जर तुम्हाला सनबर्नसारखा त्रास झाला तर यावर सर्वात आधी सनस्क्रीन नेहमीच कामी येईल.
तुम्ही घरांमध्ये असताना सनस्क्रीन लावण्याची गरज आहे का ?
आपल्यापैकी बरेचजण हे घरात असताना देखील आपल्या चेहेऱ्यावर किंवा संपूर्ण त्वचेला सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीन हे शक्यतो घरातून बाहेर पडतांना उन्हाचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी लावले जाते. परंतु आपण घरात असतांना सनस्क्रीन लावायचे की नाही, असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. सुप्रसिद्ध डॉक्टर त्वचारोग तज्ज्ञ, मानसी शिरोलीकर सांगतात, जेव्हा तुम्ही घरात असाल किंवा तुमचा थेट सूर्य किरणांशी संपर्क येत नसल्यास आपल्याला त्वचेवर सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. जर तुम्ही उन्हांत बाहेर काही काम करणार असाल किंवा बाहेर गेल्यावर जर तुमचा थेट सूर्यकिरणांशी संपर्क होणार असल्यास अशावेळी तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची खरोखरच गरज आहे.
फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...
गरजेपेक्षा जास्त सनस्क्रीन लावल्यास होऊ शकते त्वचेचे नुकसान...
१. सनस्क्रीन लोशन दिवसातून एकदाच लावणे फायद्याचे ठरते. प्रत्येक दोन तासाला सनस्क्रीन लोशन लावल्याने त्वचेवर त्याचा परिणाम होतो. पण जर तुम्ही घरा बाहेर जात असाल किंवा वाहन चालविल्यानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.
२. सनस्क्रिनमध्ये अनेक तऱ्हेच्या केमिकल्सचा वापर करण्यात येतो. यामुळे तुमच्या त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. लालपणा, खाज, सूज आणि चेहऱ्यावर चट्टे येणे या गोष्टीचे संकेत देतात की तुमच्या सनस्क्रिनमुळे तुम्हाला अलर्जी येत आहे. तसंच यामुळे तुमची त्वचा अधिक संवेदनशील होते. काही सनस्क्रिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या पॅरा अमिनो बेंजॉईक अॅसिडमुळे तुम्हाला ही अलर्जी येऊ शकते. त्यामुळे सनस्क्रिनचा वापर करताना हा योग्य प्रमाणात करायला हवा.
३. सनस्क्रिन घेताना त्यामध्ये कोणते घटक आहेत हे तपासून मगच सनस्क्रिन खरेदी करावे. याशिवाय तुम्ही २४ तासाची एक पॅच टेस्टही करून पाहू शकता. यामुळे सनस्क्रिनचा तुमच्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही हे तुम्हाला कळेल आणि वापरणं सहज शक्य होईल.