Lokmat Sakhi >Beauty > पापण्यांचे केस जाड दिसावेत म्हणून मस्कारा वापरता? ६ सोपे उपाय, नैसर्गिकरित्या पापण्या होतील दाट

पापण्यांचे केस जाड दिसावेत म्हणून मस्कारा वापरता? ६ सोपे उपाय, नैसर्गिकरित्या पापण्या होतील दाट

Tips To Make Eyelashes Thick & Beautiful : खोट्या आर्टिफिशल पापण्या आणि महागडी ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करुन पापण्यांचे केस दाट होऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 04:42 PM2023-02-06T16:42:40+5:302023-02-06T16:46:16+5:30

Tips To Make Eyelashes Thick & Beautiful : खोट्या आर्टिफिशल पापण्या आणि महागडी ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करुन पापण्यांचे केस दाट होऊ शकतात.

Do you use mascara to make your eyelashes look thicker? 6 Easy Remedies, Naturally Thicker Eyelashes | पापण्यांचे केस जाड दिसावेत म्हणून मस्कारा वापरता? ६ सोपे उपाय, नैसर्गिकरित्या पापण्या होतील दाट

पापण्यांचे केस जाड दिसावेत म्हणून मस्कारा वापरता? ६ सोपे उपाय, नैसर्गिकरित्या पापण्या होतील दाट

संपूर्ण चेहऱ्यामधील डोळे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. डोळा हा फार महत्वाचा व नाजूक अवयव आहे. डोळ्यांच्या सौंदर्यात भर घालायची असल्यांस आपल्या भुवया आणि पापण्यांच्या केसांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या डोळ्यांचे सौंदर्य जपण्यासाठी नेहेमीच महिलांचे प्रयत्न सुरु असतात.

डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी पापण्यांचे महत्वाचे मोठे योगदान असते. घनदाट, जाड पापण्या करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. आपल्या पापण्या घनदाट, जाड नसतील तर आपण त्यावर महागड्या ट्रीटमेंट किंवा खोट्या आर्टिफिशल पापण्या लावतो. परंतु या खोट्या आर्टिफिशल पापण्या आणि महागडी ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करुन आपण आपल्या पापण्या घनदाट, जाड करु शकतो(Tips To Make Eyelashes Thick & Beautiful).  

नक्की काय उपाय करता येऊ शकतो? 

१. ऑलिव्ह ऑइल - त्वचेचे सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त, ऑलिव्ह ऑइल पापण्या जलद वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब बोटांवर घेऊन हलक्या हातांनी पापण्यांवर लावा. डेली रुटीनमध्ये ऑलिव्ह ऑइलचा समावेश करून आपण पापण्यांची वाढ झपाट्याने करू शकता.   

२. खोबरेल तेल - खोबरेल तेल लावल्याने पापण्यांचे केस जाड आणि घनदाट होण्यास मदत होते. पापण्यांसाठी खोबरेल तेलाचा वापर केल्यास पापण्या जाड आणि लांब होतात. रोज रात्री झोपताना पापण्यांना खोबरेल तेलाने मसाज केल्यास पापण्या लांब आणि घनदाट होतात.  

३. व्हिटॅमिन 'ई' - व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल पापण्यांच्या वाढीसाठी अतिशय लाभदायक ठरते. व्हिटॅमिन 'ई' युक्त कॅप्सूलमध्ये असणारे फ्लयुड काढून त्याचा वापर आपण पापण्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी करू शकतो. व्हिटॅमिन 'ई' युक्त कॅप्सूलमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे पापण्या जाड आणि घनदाट होण्यास मदत होईल. 

४. ग्रीन टी - अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेली ग्रीन टी आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे, तितकीच पापण्या दाट करण्यासाठीही उपयुक्त आहे. ग्रीन टी बनवून झाल्यानंतर ती थोडी थंड होऊ द्यावी. या थंड झालेल्या ग्रीन टी चे काही थेंब बोटांवर घेऊन त्याने पापण्यांना हलकेच मसाज करावा. थोड्या वेळासाठी तसेच ठेवून मग गार पाण्याने धुवून घ्यावे.   

५. एलोवेरा जेल - एलोवेरा जेल आपल्या त्वचेसाठी जितके चांगले असते तितकेच पापण्यांची जाडी आणि घनदाट करण्यासाठी ते अधिक प्रभावी आहे. काजळ लावण्याची स्टिक पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याचा वापर करून पापण्यांवर कोरफड जेल लावा. या उपायाचा अवलंब करत राहिल्यास पापण्यांची वाढ झपाट्याने होते. रात्रभर पापण्यांवर एलोवेरा जेल लावून सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. असे केल्यास पापण्या जाड आणि घनदाट होतात. 

६. बदामाचे तेल - बदामाचे तेल त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी देखील वापरले जाते. पापण्या जाड करण्यासाठी, बदामाच्या तेलात मस्कराचा स्वच्छ ब्रश बुडवा आणि पापण्यांना लावा. असे सतत केल्याने तुमच्या पापण्या लवकर वाढतील आणि तुमची केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधनांपासून सुटका होईल.

Web Title: Do you use mascara to make your eyelashes look thicker? 6 Easy Remedies, Naturally Thicker Eyelashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.