Lokmat Sakhi >Beauty > आय मेकअप करता पण डोळ्यात सतत पाणी येते, आग होते? ६ उपाय - मेकअप करूनही डोळे राहतील निरोगी

आय मेकअप करता पण डोळ्यात सतत पाणी येते, आग होते? ६ उपाय - मेकअप करूनही डोळे राहतील निरोगी

While Makeup Eyes are constantly watering and burning? 6 Remedies will help out डोळ्यांवर मेकअप केल्याने पाणीदार होतात, मेकअप बिघडतो? ६ उपाय - डोळ्यांवरील मेकअप होणार नाही खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 01:42 PM2023-01-19T13:42:56+5:302023-01-19T13:43:58+5:30

While Makeup Eyes are constantly watering and burning? 6 Remedies will help out डोळ्यांवर मेकअप केल्याने पाणीदार होतात, मेकअप बिघडतो? ६ उपाय - डोळ्यांवरील मेकअप होणार नाही खराब

Do you wear eye make-up but your eyes are constantly watering and burning? 6 Remedies - Eyes will remain healthy even with makeup | आय मेकअप करता पण डोळ्यात सतत पाणी येते, आग होते? ६ उपाय - मेकअप करूनही डोळे राहतील निरोगी

आय मेकअप करता पण डोळ्यात सतत पाणी येते, आग होते? ६ उपाय - मेकअप करूनही डोळे राहतील निरोगी

सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करून पाहतात. बहुतांश महिला मेकअपचा देखील आधार घेतात. मेकअप आपल्या चेहऱ्याला फक्त सुंदर बनवत नसून, प्रेजेंटेबल दिसण्यात मदत करतात. महिला त्यांच्या ऑकेजननुसार मेकअप कसा करायचा हे ठरवतात. मेकअपमध्ये महिलांना डोळ्यांना आणि ओठांना मेकअप करण्यास आवडते. डोळ्यांना मेकअप करणे महिलांना काहीसं अवघड जाते.

डोळे आकर्षक दिसण्यासाठी महिला काजळ, मस्कारा, आयलायनरचा वापर करतात. मात्र, डोळ्यांना जरा देखील इजा झाल्यास डोळे सुजणे, डोळे लाल पडणे अशा समस्या उद्भवतात. आय मेकअप करताना अनेकदा डोळ्यांमधून पाणी येऊ लागते. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप देखील अधिक काळ टिकत नाही. जर आपण देखील या समस्येला सामोरे जात असाल तर, कोणती काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात जाणून घ्या.

स्वच्छता सर्वात महत्वाची

आपण जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुतो. त्यानंतरच अन्नाचे सेवन करतो. त्याचप्रमाणे मेकअप करण्यापूर्वी हात यासह डोळ्यांना मेकअप करणारे उत्पादने स्वच्छ करा. डोळे जेव्हा बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांमधून पाणी येऊ लागते. त्यामुळे डोळ्यांना अलर्जी देखील होते. अशा परिस्थितीत डोळ्यांना मेकअप करण्यापूर्वी हातांना स्वच्छ करा.

मेकअपसाठी हायपोअलर्जेनिक उत्पादनांचा वापर करा

सौंदर्यप्रसाधने खरेदी करत असताना नेहमी हायपोअलर्जेनिक उत्पादने निवडा. विशेषतः काजल, मस्करा, आयलायनर आणि आयशॅडो निवडताना हे लक्षात ठेवा. त्यांचा वापर केल्याने डोळ्यांना ऍलर्जी होणार नाही. याने डोळे टवटवीत राहतील.

मेकअप ब्रश स्वच्छ ठेवा

मेकअप करण्यापूर्वी मेकअप ब्रश स्वच्छ असणे महत्वाचं. मेकअप ब्रशचा वापर केल्यानंतर त्यावर बॅक्टेरिया साचतात. याने चेहऱ्याला हानी पोहचू शकते. आपण डोळ्यांचा मेकअप ब्रश साफ न करताच वापरत असाल तर वेळीच थांबवा. याने डोळ्यांना अलर्जी होण्याची शक्यता निर्माण होते. डोळ्यांना वापरण्यात येणारे ब्रश नेहमी स्वच्छ वापरावे.

डोळ्यांचे थेंब वापरा

मेकअप केल्यानंतर बहुतांश जणींचे डोळे लालसर पडतात. डोळ्यांना मेकअप करण्यापूर्वी डोळे स्वच्छ पुसून घ्या. डोळे स्वच्छ केल्यानंतर त्यात आयड्रोप टाका. याने मेकअप केल्यानंतर डोळ्यात जळजळ होणार नाही. मेकअपच्या अर्धा तास आधी वापरल्यास डोळे टवटवीत दिसतील.

लोअर लॅशवर मेकअप करू नका

डोळे मोठे आणि टवटवीत दिसण्यासाठी आपण मस्काराचा वापर करतो. मस्कारा डोळ्यांच्यावरील लॅशवर लावण्यात येतो. मात्र, खालील लॅशवर लाऊ नये असा सल्ला दिला जातो. आपल्या डोळ्यांखालील लॅश अतिशय संवेदनशील आणि नाजूक असतात. मस्कारामधील रसायने डोळ्यांना इजा पोहचवू शकते. त्यामुळे त्याच्यावर कमी प्रोडक्ट्सचा वापर करावा.

झोपण्यापूर्वी डोळ्यांना स्वच्छ ठेवा

झोपण्यापूर्वी अनेक जण मेकअप ठेऊन झोपतात. याने चेहऱ्याला हानी पोहचू शकते. डोळ्यांचा मेकअप देखील वेळेवर काढावा. झोपण्यापूर्वी मेकअप रिमुव्हरने डोळ्यांचा मेकअप काढून टाकावा.

Web Title: Do you wear eye make-up but your eyes are constantly watering and burning? 6 Remedies - Eyes will remain healthy even with makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.