Join us

उन्हाळ्यात ओठ का फुटतात? साल निघतं, रक्त येतं अशा कोरड्या ओठांसाठी पाहा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 13:42 IST

How to treat dry and cracked lips in summer: Simple home remedies for soft and pink lips: Natural ways to heal dry lips at home: काही सोपे घरगुती उपाय केले तर उन्हाळ्यात ओठांची काळजी आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल.

उन्हाळा सुरु झाला की संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.( lip care for smooth lips in hot weather) या काळात आपल्याला त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. डिहायड्रेशनमुळे जितका शरीरावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवर देखील होतो.(How to treat dry and cracked lips in summer) त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण महागडे क्रीम्स आणि सनस्क्रीनचा वापर करतो, ज्यामुळे त्वचा टॅन होण्यापासून रोखली जाते. (Simple home remedies for soft and pink lips)त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक ब्युटी उत्पादनाचा वापर करतो.(Summer lip care routine for glowing lips) परंतु, ओठांचे सौंदर्य मात्र बिघडलेले असते. ओठ काळे पडणे, फाटणे किंवा कोरडे पडणे यांसारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.(Homemade lip scrub for dry and dark lips) गुलाबी आणि मऊमुलायम ओठ व्हावे यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनाचा उपयोग करतो. पण काही सोपे घरगुती उपाय केले तर उन्हाळ्यात ओठांची काळजी आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल. 

उन्हाळ्यात 'या' पद्धतीने लावा नारळाचे तेल, त्वचेचा ग्लो वाढतच जाईल...

1. लिप बामआपल्या ओठांना मऊ आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम वापरा. यामुळे आपले ओठ फुटणार नाही तसेच निरोगी देखील राहातील. 

2. भरपूर पाणी प्याओठ निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ओठ कोरडे पडू लागतात. यासाठी दिवसभरात शक्य होईल तितके पाणी प्या. 

3. नारळाचे तेल किंवा मध 

रात्री झोपण्यापूर्वी ओठांना नारळाचे तेल किंवा मध लावा. हे आपल्या ओठांना खोल मॉइश्चरायझर करते. यामुळे आपले ओठ मऊ होतात.

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ 

4. दही 

ओठांची त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज झाली असेल तर त्यावर दही लावू शकता. कमीत कमी १५ मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा, ज्यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील. 

5. लिपस्टिकचा वापर 

लिपस्टिकचा वापर जास्त प्रमाणात केल्याने ओठ कोरडे होतात. यासाठी जेव्हा ओठांना आपण लिपस्टिक लावतो तेव्हा ती काढण्यापूर्वी त्यावर लिप बाम लावा ज्यामुळे आपले ओठ कोरडे होणार नाहीत. 

गुलाबी लाली आणि ओठ लाललाल.. ‘अशी’ करा गुलाबाच्या पाकळ्यांची लिपस्टिक, रोज ‘रोझ’ डे!

6. कोरफड 

कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक आढळतात. जे आपल्या ओठांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफड ओठांसाठी नैसर्गिक उपाय आहे. कोरफडमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजी