१२ महीने, २४ तास एकच त्रास प्रत्येकाला होतो, तो म्हणजे काखेतून घामामुळे दुर्गंधी पसरणे. अंडरआर्म्समधून दुर्गंधी येणे ही समस्या कॉमन झाली आहे. ही दुर्गंधी त्वचेखाली असलेल्या ग्रंथीमधून तेल बाहेर पडल्यामुळे येते. या ग्रंथी काखेभोवतीच असतात. त्यामुळे घामाला दुर्गंधी येते. आपले व्यक्तिमत्व आपण किती स्वच्छ राहतो, यावर डिपेंड असते.
जर आपल्या काखेतून दुर्गंधी पसरत असेल तर, याचा थेट परिणाम आपल्या कॉन्फिडेंसवरही होतो. अनेकदा परफ्युमचा वापर करूनही काखेतून दुर्गंधी पसरू लागते. परफ्युम, अत्तर या सुगंधित वस्तूंचा वापर करण्यापेक्षा ५ रुपयांच्या फिटकरीचा वापर करून पाहा. शरीरातून दुर्गंधी घालवण्यासाठी फिटकरीचा वापर कसा करायचा पाहूयात(Does alum reduce body odor?).
केस पातळ - निर्जीव दिसतात? केसांवर लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट
फिटकरीमुळे दूर होईल घामाचा दुर्गंध
ऋतू कोणताही असो घाम आला की शरीरातून दुर्गंधी पसरतेच. अनेकदा परफ्युमचा वापर करूनही दुर्गंधी जात नाही. जर शरीरातून घामाचा दुर्गंध पसरू नये, असे वाटत असेल तर, फिटकरीचा वापर करा. तुरटीचा वापर आपण आंघोळीदरम्यान देखील करू शकता. तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातून घामाचा दुर्गंध पसरत नाही.
तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा ऑईली होते का? नक्की कोणते स्किनकेअर रुटीन फॉलो करावे? काय खावे?
आंघोळीदरम्यान तुरटीचा वापर कसा करावा?
आंगोळीदरम्यान, तुरटीचा वापर कसा करावा, हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी एक बादली पाण्यात २ तास तुरटीचा खडा घालून ठेवा. तुरटी पाण्यात विरघळल्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. व स्वच्छ टॉवेलने शरीर नीट पुसून काढा. यामुळे शरीरातून दुर्गंधी येणार नाही. वाटल्यास आपण तुरटी रात्रभर पाण्यात घालून ठेऊ शकता.