Join us  

काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? दुधात मिसळा ३ गोष्टी; डार्क सर्कल होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2024 7:32 PM

Does applying cold milk under the eyes reduce dark circles? : डार्क सर्कलवर घरगुती सोपा उपाय

डार्क सर्कलच्या समस्येमुळे स्त्री - पुरुष दोघेही त्रस्त आहेत (Dark Circles). डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची शोभा कमी होते. ज्यांच्या त्वचेचा रंग गोरा आहे, त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं ठळक दिसतात (Skin Care Tips). डार्क सर्कलसारख्या समस्येला तोंड देणारे तुम्ही एकटे नाही आहात (Eye Care). अगदी मोठ्या अभिनेत्रींनाही या समस्येचा सामना करावा लागतो (Home Remedy).

डार्क सर्कलपासून सुटका हवी असेल तर, ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण काही घरगुती उपायही वापरून पाहू शकता. या उपायामुळे काळी वर्तुळं गायब होतील. शिवाय चेहऱ्यावर तेज येईल. यासाठी आपण दुधाचा वापर करून पाहू शकता. दुधाच्या वापरामुळे काळी वर्तुळं नैसर्गिकरीत्या गायब होतील(Does applying cold milk under the eyes reduce dark circles?).

काळी वर्तुळं कमी करण्यासाठी घरगुती उपाय

लागणारं साहित्य

दूध

व्हिटॅमिन ई

कॉफी

'या' तेलात मिसळा कांद्याचा रस आणि लावा केसांना, महिनाभरात वेणी दिसेल जाडजूड आणि केस मऊ

ग्रीन टी

या पद्धतीने तयार करा होममेड क्रीम

एका भांड्यात २ चमचे दूध घ्या. त्यात एक चमचा व्हिटॅमिन ई तेल, एक चमचा कॉफी, एक चमचा ग्रीन टी घालून सर्व साहित्य मिक्स करा. तयार पेस्ट डोळ्यांखाली लावा. १५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा घरगुती आय मास्क आठवड्यातून तीन दिवस लावा. यामुळे काही दिवसात काळी वर्तुळं कमी होतील.

काळी वर्तुळांवर घरगुती उपाय

झोप

थकवा आणि झोपेचा अभाव यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे होऊ शकतात. यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसू लागते. ज्यामुळे काळी वर्तुळे अधिक गडद दिसू शकतात. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येऊ शकणार नाहीत.

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे. कारण याद्वारे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणार नाही. पण जास्त सूर्यप्रकाशाजवळ बसू नका. यामुळे टॅनिंग व्यतिरिक्त डार्क सर्कल तयार होऊ शकतात.

पावसात भिजल्यानंतर केस फक्त टॉवेलने पुसण्याची चूक करू नका, ४ टिप्स; केस गळणे थांबेल

काकडी

काकडी फक्त खाण्यासाठी नसून, डार्क सर्कलवर उपाय म्हणूनही याचा वापर करू शकता. यासाठी चिरलेली काकडी काळ्या वर्तुळावर १० मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी