योगगुरु रामदेव बाबा (Yog guru Ramdev Baba) यांनी काही वर्षांपूर्वी केस वाढवण्याचा अनोखा मार्ग सांगितला होता. हातांची नखं घासल्याने डोक्यावरील केस लवकर वाढतात, असं त्यांनी म्हटलं होतं. अनेकांनी तो प्रयोग करुनही पाहिला. रिकामा वेळ मिळाला की लोकं नखं घासत बसायचे. मात्र खरंच तसं केल्यानं केस वाढतात का? केस गळणं थांबतं का? नेमकं हे कितपत खरं?(Does Balayam (nail rubbing) actually help your hair grow?).
नखं असे एकमेकांवर घासण्याला बालायम असे म्हणतात. ही एक प्रकारची ऑफ्शनल रिफ्लेक्सोलॉजी थेरपी आहे. नखं रक्तवाहिन्यांद्वारे डोक्याच्या मज्जासंस्थेशी जोडलेली असतात. जेव्हा आपण नखे घासतो, तेव्हा स्काल्पवरील रक्तपुरवठा जलद गतीने होतो. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब
केसांची वाढ कॉर्टिकल पेशींमुळे होते. या पेशी केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेल्या असतात. जेव्हा नखं घासली जातात. तेव्हा कॉर्टिकल पेशी तयार होतात, व केस मजबूत होतात. त्यातून केसांची वाढ चांगली होऊ लागते. दररोज ५ ते १० मिनिटे नखं एकमेकांवर घासल्याने केस वाढू शकतात. हे बालायम करण्यासाठी अंगठा वगळता सर्व बोटांची नखे घासावी.
स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा
या लोकांनी नखे घासणे टाळावे
नखं घासणे केसांसाठी फायदेशीर मानली जाते. परंतु, ज्यांना हाय ब्लड प्रेशर, मधूमेह आहे. गरोदर महिला यांनी हे आसन करु नये. बालायम आसन केल्याने शरीरातील रक्तदाब वाढतो. ज्यांची अँजिओग्राफी किंवा शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनीही हे आसन करू नये.