आजकाल तंत्रज्ञान इतकं झपाट्याने वाढत चाललं आहे, की प्रत्येक गोष्टीसाठी आपण मशीनचा वापर करतो. आपण मशीनच्या एवढ्या अधीन झालो आहोत की, मशीन शिवाय आपलं पान देखील हलत नाही. मात्र, काही मशीनचा अतिवापर केल्याने आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. केस सुकविण्यासाठी आपण कधी कधी हेअर ड्रायरचा वापर करतो. परंतु, प्रत्येक हेअर वाॅशनंतर, हेअर ड्रायरचा वापर केला पाहिजे का ? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र, हेयर ड्रायरचा अतिवापर केल्याने त्याचा थेट परीणाम आपल्या केसांवर होतो. हेअर ड्रायरचा अतिरिक्त वापर केल्याने त्वचेमधील ओलावा तर कमी होतोच, ड्रायनेस वाढतो. यासह इतर केसांच्या समस्या उद्भवू शकतात.
केस पांढरे होण्याची शक्यता
जर आपण नियमित हेअर ड्रायरचा वापर करत असाल, तर तुमचे केस लवकर पांढरे होण्याची दाट शक्यता आहे. कारण हेअर ड्रायरमधील हवा तुमच्या केसांमधील मेलेनिन काढून टाकते. या कारणामुळे तुमच्या केसांच्या रंगावर दुष्परिणाम होऊ शकतो. याने केस पांढरे होऊ लागतात. यासह निर्जीव देखील दिसू लागतात. त्यामुळे हेअर ड्रायरचा अतिवापर शक्यतो टाळावे.
केसांमध्ये फाटे फुटण्याची शक्यता
हेअर ड्रायरच्या अतिरिक्त वापरामुळे केसांमध्ये फाटे फुटण्याची शक्यता अधिक प्रमाणावर दिसून येते. ओल्या केसांवर हेअर ड्रायरचा वापर केल्याने केसांमधील ओलावा नाहीसा होतो. केस कोरडे होऊ लागतात. यासह केसांमध्ये फाटे फुटण्याची शक्यता निर्माण होते. ज्यामुळे केसगळतीची समस्या निर्माण होते.
डिहायट्रेशन
जर आपण हेअर ड्रायर मॅट लिप्सटीक आणि केस सुकविण्यासाठी वापरत असाल, तर त्वचेच्या संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्वचा निर्जीव, कोरडी होते. खाज येते. ओठ कोरडे पडतात.
डोळ्यांना इजा होणे
हेअर ड्रायरमधून निघणारी हवा तुमच्या डोळ्यांना इजा पोहचवू शकते. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा जाणवू शकतो. तसेच तुमच्या डोळ्यात जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर जरी करत असाल तर डोळ्यांपासुन मशीन लांब ठेऊन त्याचा वापर करावा.
केस सुकविण्यासाठी शक्य तितके नैसर्गिक हवेचा वापर करावा, हेअर ड्रायरचा वापर कमी करावा. तसेच मेकअप सुकविण्यासाठी देखील पंख्याचा किंवा नैसर्गिक हवेचा वापर करा. जेणेकरून तुमच्या कोमल त्वचेवर इजा होणार नाही.