एखादी पार्टी असो या कार्यक्रम आपण आपल्या लुकवर जास्त भर देतो. कारण आपल्याला स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसायचं असतं. आपण परिधान केलेल्या पोशाखापेक्षा महिलांसाठी मेकअप जास्त महत्वाचा असतो. मेकअप ऑन - पॉईंट झाला की महिला पार्टीसाठी रेडी झाल्या म्हणून समजा. पार्टी मेकअपसाठी महिला लिपस्टिकमध्ये गडद रंगाचा वापर जास्त करतात. गडद रंगाच्या बोल्ड लिपस्टिकमुळे तुमचा स्टेटमेंट लूक पूर्ण होतो. शिवाय बोल्ड लिपस्टिकमुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र या बोल्ड लिपस्टिकचा एक तोटाही आहे.
तोटा असा की, आपलं पार्टीमध्ये खाणं - पिणं चालूच असतं. त्यात गडद रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे काहीही खाताना अथवा पिताना लिपस्टिकचे डाग कप, ग्लासवर लागतात. ज्यामुळे पार्टीमध्ये तुम्हाला थोडं फार संकोच नक्कीच वाटू शकते. शिवाय अशा प्रकारे सर्व गोष्टींना लिपस्टिक लागत राहिल्यास तुमच्या ओठांवरील लिपस्टिक खराब होते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार लिपस्टिक टचअप करावे लागते. दरम्यान, या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही ट्रिक फॉलो करा. हे ट्रिक नक्कीच आपल्या फायदेशीर ठरतील.
लिपस्टिक लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
मेकअप लावण्यापूर्वी आपण त्वचेची ज्याप्रमाणे काळजी घेतो. त्याचप्रमाणे ओठांची काळजी घेणं आवश्यक. ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना एक्सफोलिएट किंवा मॉईस्चराईझ करा. त्याचप्रमाणे लिपस्टिक लावण्याआधी नेहमी ओठांवर लिप प्रायमर लावा. याने ओठ काळपट पडणार नाही.
लिपलायनरचा करा वापर
बऱ्याचदा आपण फक्त लिपस्टिक लावून मोकळे होतो. मात्र ओठांवर थेट लिपस्टिक लावू नये. यासाठी आधी ओठांच्या कडेने लिप लायनर लावा आणि मग लिपस्टिकने ओठ फिल करा. ज्यामुळे लिपस्टिक जास्त काळ टिकण्यास मदत होईल. अशा प्रकारे लिपस्टिक लावल्यास ती कप, ग्लासवर लागणार नाही.
लिपस्टिक ब्लॉट करा
यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर ती सुकण्यासाठी काही सेंकद वाट पाहा. त्यानंतर एक स्वच्छ टिश्यू घ्या आणि ओठांवर दाबून ठेवा ज्यामुळे ओठांवरील अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल. त्यानंतर लिपस्टिक पुन्हा ओठांवर लावा. यामुळे ओठ तर आकर्षक दिसतील पण तुमची लिपस्टिक लवकर खराब होणार नाही.
पावडरने ओठ डस्ट करा
लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर टिश्यू पेपर ठेवा आणि त्यावर पावडर डस्ट करा. ज्यामुळे ओठांवरील अतिरिक्त तेल टीश्यू आणि पावडर शोषून घेईल. ज्यामुळे लिपस्टिक काहिही खाताना अथवा पिताना कप, ग्लासवर लागणार नाही. शिवाय तुम्हाला सतत टचअप देखील करावं लागणार नाही. यातून ओठांना एक मॅट लिपस्टिक लूक मिळेल.