पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पावसाचा अद्याप पत्ता नाही. पण पावसाची पूर्व तयारी अनेकांकडे जोरदार सुरु आहे. पहिल्या पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी आहे. दरवळणारा मातीचा सुगंध देखील प्रत्येकाला आवडतो. लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पावसात भिजायला आवडते.
परंतु, पावसात भिजण्याचे तोटे देखील आहेत, यामुळे आपल्या स्किन व केसांचे नुकसान होऊ शकते. अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की, पावसात भिजल्यानंतर केस धुवावे का? पावसाच्या पाण्यामुळे स्काल्प व केसांचे नुकसान होऊ शकते का? पावसाळ्यात केसांची नक्की कशी काळजी घ्यावी हे पाहूयात(Does rainwater damage your hair?).
पावसाचे पाणी केसांसाठी किती हानिकारक आहे?
पावसाचे पाणी केसांची रचना कमकुवत करू शकतात. ज्यामुळे केस कोरडे होतात. पावसाचे पाणी टाळूचे पीएच खराब करू शकते. ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात, अशा स्थितीत केस गळतीची समस्या निर्माण होते. काही वेळेला एसिडिक रेन पडते, ज्यात प्रदूषणाचे कण समाविष्ट असतात. अशा स्थितीत केसांचे पोत तर खराब होतेच, यासह केस गळती व केस पातळ होण्याची समस्या वाढते.
पावसाळ्यात केसांचं गळणं जास्त वाढतं, करा ५ रुपयांच्या तुरटीचा सोपा उपाय
पाऊस पडल्यावर केस धुवावेत का?
ही सर्व कारणे पाहता, पावसात भिजल्यानंतर केस धुणे आवश्यक आहे. माईल्ड शॅम्पूने केस धूवा. व पावसात भिजल्यानंतर त्वरित केस धुवावेत.
खा तूप मिळेल रुप! चेहऱ्यासह ओठ आणि हातपायांना तूप लावण्याचे ५ फायदे
पावसाळ्यात केस कसे निरोगी ठेवायचे?
सर्वप्रथम, पावसात बाहेर पडताना डोके कव्हर करा. ज्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे ते भिजणार नाहीत. नेहमी आपल्यासोबत छत्री ठेवा व पावसात भिजणे टाळा. दुसरे म्हणजे, दर दोन दिवसांनी केसांना तेल लावा आणि तीन दिवसांनी शॅम्पूने केस धुवा.
यासोबतच केसातील कोंडा कमी करण्यासाठी, आठवड्यातून एकदा लिंबाचा रस दह्यात मिसळून केसांना लावा, त्यानंतर केस धुवा. अशा प्रकारे आपण केसांची निगा राखू शकता.