Join us  

हातावरील मेहेंदीचा रंग गडद होत नाही? ५ चुका टाळा, हातावर चढेल मेहेंदीचा रंग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 1:31 PM

Does the color not darken after applying henna? 5 mistakes are the reason for this मेहेंदी लावताना किंवा लावल्यानंतर या ५ चुका तर तुम्ही करत नाही ना? या चुकांमुळे मेहेंदीचा रंग फिका पडतो..

''देखो तो मेरे हातो की मेहेंदी कैसे रंगी है'', मैने प्यार किया या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीचा हा डायलॉग प्रचंड गाजला. मेहेंदी हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय. खरंतर, मेहेंदीमुळे महिलेच्या सौंदर्यात भर पडते. कोणताही सण असो किंवा फंक्शन, महिलावर्ग मेहेंदी आवर्जून लावतात. आपलीच मेहंदी सर्वात गडद कशी दिसेल, यासाठी अनेक उपाय करून पाहतात.

प्रत्येक मेहेंदी हातावर रंगेलच असे नाही. मात्र, मेहेंदी लावताना किंवा लावल्यानंतर काही चुका झाल्या तर, मेहेंदीचा रंग नक्कीच फिका पडू शकतो. मेहेंदी हातावर रंगेल कशी? मेहेंदी लावताना कोणती काळजी घ्यावी? मेहेंदीचा रंग फिका पडू नये यासाठी कोणते उपाय मदतीला येईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज मिळतील(Does the color not darken after applying henna? 5 mistakes are the reason for this ).

मेहेंदी लावल्यानंतर या चुका करणे टाळा

साबणाने हात धुवू नका

मेहेंदी सुकल्यानंतर बहुतांश जण साबणाने हात धुतात. मात्र, या चुकीमुळेच हातावरील मेहेंदी फिकी पडते. मेहेंदी सुकल्यानंतर लगेच साबण किंवा साबणाच्या पाण्याने हात धुवू नका. काही साबणांमध्ये केमिकलयुक्त रसायने आढळतात. ज्यामुळे मेहेंदीचा रंग फिका पडू शकतो. यासह डिझाइनही खराब होऊ शकते.

फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करणे टाळा

मेहेंदी लावल्यानंतर हाताची वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करणे टाळा. वॅक्सिंग किंवा शेव्हिंग कराचे असेल, तर मेहेंदी लावण्याच्या आधी करा, आणि मगच मेहेंदी लावा. वॅक्सिंग किंवा शेव्हिंग केल्याने त्वचेवरील थर निघून जातो. ज्यामुळे मेहेंदीचा रंग फिका पडण्याची शक्यता वाढते.

व्हिटॅमिन सीचे महागडे फेसपॅक वापरता? त्यापेक्षा पपई खा आणि पपईच्या सालांचा करा फेसपॅक, पाहा इफेक्ट

पाण्यापासून दूर राहा

मेहेंदी काढल्यानंतर लगेच हात धुवू नका. किमान सहा तास पाण्यापासून हातांचे संरक्षण करा. शक्य असल्यास, मेहेंदी लावल्यानंतर १२ तासांनंतरच आंघोळ करा. यासाठी उत्तम उपाय म्हणजे रात्रीच्या वेळी मेहेंदी लावा.

लिंबू साखरेचा उपयोग

मेहेंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी, अधिक लोकं साखर आणि लिंबाचा वापर करतात. ज्यामुळे मेहंदीचा रंग गडद तपकिरी होतो. मात्र, याचा वापर कमी करावा जेणेकरून हातावर मेहेंदीचा नैसर्गिक रंग उठेल.

डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी करायचे आहेत? रोज ५ मिनिटं करा ही सोपी मुद्रा, व्हा टेंशन फ्री

ड्रायरचा वापर

हाता-पायांची मेहंदी लवकर सुकवण्यासाठी बहुतांश जण ब्लो ड्रायरचा वापर करतात. याच्या वापरामुळे मेहंदीचा रंग गडद होणार नाही. याच्या वापरामुळे मेहेंदी व डिझाईन खराब होऊ शकते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी