(Image Credit- The list)
सौंदर्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्वचेची काळजी घेणारे नवनवीन उत्पादनं सतत आपलं लक्ष वेधत असतात. केवळ नवीन उत्पादनंच येतात असं नाही तर नवनवीन संकल्पनाही सौंदर्याच्या जगात येतात , लक्ष वेधतात आणि रुढ होतात कोणतीही नवीन संकल्पना जेव्हा रुढ व्हायला लागते तेव्हा त्यामागे तिची प्रत्यक्ष परिणामकारकता महत्त्वाची असते. अशीच एक नवीन संकल्पना सौंदर्याच्या विश्वात लक्ष वेधत असून ती लोकप्रियही होत आहे. ‘मॉइश्चर सॅण्डविच’ ही ती नवीन संकल्पना.कोरडी त्वचा ही अनेक समस्यांना आमंत्रण देते. कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर लावण्याचा उपाय आहे. पण कोरड्या त्वचेसाठी केवळ मॉइश्चरायझर लावून भागत नाही. थोड्या वेळ त्याचा असर राहातो की पुन्हा त्वचा कोरडी पडते.त्वचेवर चमक येण्यासाठी, तसेच चेहेर्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी त्वचा दीर्घकाळ ओलसर राहाणं गरजेचं आहे. कोरड्या त्वचेबाबत हे शक्य होत नाही. आणि म्हणूनच त्यासाठी मॉइश्चर सॅण्डविच हा पर्याय आहे. सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की मॉइश्चर सॅण्डविच हे कोरड्या त्वचेसाठी एक जादूई पर्याय आहे. आपल्या त्वचेला मॉइश्चर सॅण्डविचचा पौष्टिक नाश्ता दिल्यास कोरडी त्वचाही चमकदार दिसेल हे नक्की.
‘मॉइश्चर सॅण्डविच’ काय आहे?
मॉइश्चर सॅण्डविच हे काही सौंदर्य उत्पादन नाही. ही एक प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेची देखभाल करणारी उत्पादनं लावण्याची ही एक पध्दत आहे. यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण जे काही चेहेर्यास लावतो त्याचा परिणाम चांगला होतो आणि दीर्घकाळ टिकतो. तसेच त्वचेतील ओलसरपणा टिकून राहातो. यामुळे त्वचा ही छान मऊ आणि चमकदार होते. यासाठी ओलसर त्वचेवर सर्वात आधी लाइट प्रोडक्टस लावली जातात आणि मग हेवी मॉइश्चरायझर किंवा तेल यांचा थर दिला जातो. मॉइश्चर सॅण्डविच या प्रक्रियेत प्रत्येक थरानंतर अर्थात लेअर नंतर त्वचा ओलसर करण्यासाठी टॅप वॉटर किंवा फेस मिस्टचा वापर केला जातो. फेस मिस्ट म्हणजे चेहेरा ओलसर ठेवणारं एक स्प्रे बॉटल वॉटर. यात त्वचेची काळजी घेणारे अनेक घटकांचा समावेश असतो.
कसं करतात मॉइश्चर सॅण्डविच?
सर्वात आधी चेहेरा सौम्य क्लिन्जरचा वापर करुन स्वच्छ करावा. त्यानंतर चेहेर्याला टोनर लावावं. टोनर त्वचेत पूर्ण शोषलं जाण्याआधीच फेस सीरमनं चेहेर्याचा मसाज करावा.सॅण्डविचची प्रक्रिया ही अशी सुरु होतो. फेस सीरमनं मसाज केल्यानंतर चेहेर्याला काही लावण्याआधी फेशियल मिस्टद्वारे ओलसर करावं. आणि त्वचेला ओलसर ठेवणारे उत्पादनं आपण लावू शकतो. शेवटच्या टप्प्यात चेहेर्याला पुन्हा फेशिअल मिस्टद्वारे हलकंसं ओलसर करुन घ्यावं आणि मग जास्त मॉइश्चरायझर लावून त्वचेला दिलेला ओलसरपणा सील करुन टाकतो. ही क्रिया रोज रात्री केल्यास कोरडी त्वचा लवकरच चमकदार दिसते.चेहेरा फेशिअल मिस्टनं आधी ओलसर करा मग सीरम लावा, पुन्हा चेहेरा ओला करा मॉइश्चरायझर लावा, पुन्हा चेहेरा ओलसर करा आणि हेवी मॉइश्चरायझर लावा ही कृती थोडी थकवणारी वाटत असली तरी कोरडी त्वचा ओलसर करण्याचा हा उत्तम उपाय आहे. तो परिणामकारखी आहे. यामुळे ओलसरपणा त्वचेच्या आतपर्यंत झिरपतो. परिणामी त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार होते.
काय काळजी घ्याल?
मॉइश्चरायझर सॅंण्डविच ही प्रक्रिया करताना त्वचेला ओलसर ठेवणार्या उत्पादनांचाच वापर करावा. रेटिनॉल किंवा एक्सफोलिएटिंग अँसिड या उत्पादनांचा वापर मॉइश्चरायझर सॅण्डविचमधे करु नये. जर त्वचा कोरडी आणि संमिर्श प्रकारची असेल तर हेवी मॉइश्चरायझर न लावता लाइट मॉइश्चरायझरचा उपयोग करावा.