बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, आरोग्यविषयक समस्यांचा धोका कमी करण्यासाठी ग्रीन टी प्याला जातो. ग्रीन टी हा सौंदर्य समस्या घालवण्यासाठीही उपयुक्त ठरतो. पण यासाठी ग्रीन टी केवळ पिऊन चालत नाही तर तो चेहेऱ्यावर लावावाही लागतो. ग्रीन टीमध्ये ॲण्टि एजिंग आणि ॲण्टिऑक्सिडण्टस गुणधर्म असल्याने स्कीन एजिंगचा धोका टाळण्यासाठी, सुरकुत्या घालवण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो.
Image: Google
चेहेऱ्यावरील डाग, मुरुम, पुटकुळ्या घालवण्यासाठी आपल्या ब्यूटी रुटीनमध्ये ग्रीन टीचा समावेश करणं आवश्यक असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. विविध सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यासाठी ग्रीन टीचे वेगेवेगळे फेसपॅक तयार करुन ग्रीन टीचा समावेश सौंदर्योपचारात करता येतो.
Image: Google
1. मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग करता येतो. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा जिवाणुविरोधी घटक असतो. हा घटक मुरुम पुटकुळ्यांना कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणुविरोधात लढतो. तसेच हा घटक शरीरातील हार्मोनल असंतुलन नियंत्रणात ठेवतो. म्हणूनच ग्रीन टी पिण्यासोबतच ग्रीन टी चेहेऱ्यास लावणंही महत्त्वाचं ठरतं. मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी ग्रीन टीचा लेप तयार करताना पाव कप पाणी उकळावं. उकळलेल्या पाण्यात ग्रीन टीचं पाऊच टाकावं. पाणी थोडी थंडं होवू द्यावं. मग कापसाच्या बोळ्यानं ग्रीन टीचं पाणी चेहेऱ्यास जिथे मुरुम पुटकुळ्या आहेत तिथे लावावं. ग्रीन टी चेहेऱ्यास लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहेरा थंडं पाण्यानं धुवावा.
Image: Google
2. उन्हानं काळवंडलेला चेहरा उजळ करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. यासाठी दोन ग्रीन टी बॅग्ज घ्यावात. त्या कात्रीने कापून ग्रीन टी चहा एका वाटीत काढावा. या चहात थोडा लिंबाचा रस घालावा. 2 चमचे मध घालावं. हे सर्व नीट एकजीव करावं. ग्रीन टीची ही पेस्ट चेहेऱ्यास लावावी. पेस्ट लावून झाल्यानंतर दहा मिनिटांनी चेहेरा थंडं पाण्यानं धुवावा.
Image: Google
3. एजिंगचा धोका टाळण्यासाठी किंवा चेहेऱ्यावरचं वाढलेलं एजिंग कमी करण्यासाठी ग्रीन टी फेस मास्कचा उपयोग करावा. यासाठी ग्रीन टी बॅग्जमधला ग्रीन टी एका बाऊलमध्ये घालावा. यात 3 मोठे चमचे दही घालावं. चिमूटभर हळद घालावी. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण चेहेरा आणि मानेस लावावं. 20 मिनिट हा लेप चेहेऱ्यावर राहू द्यावा. 20 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
4. डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी ग्रीन टी बॅग्जचा उपयोग करता येतो. यासाठी 2 ग्रीन टी बॅग्ज घ्याव्यात. गरम पाण्यात या टी बॅग्ज घालून ओल्या कराव्यात. टी बॅग्ज थंड झाल्यावर डोळे बंद करुन डोळ्यांवर ठेवाव्यात. 15 मिनिटानंतर या बॅग्ज काढून डोळे थंडं पाण्यानं धुवावेत. या उपायानं काही दिवसातच डोळ्याखालील काळी वर्तुळं निघून जातात.