Lokmat Sakhi >Beauty > डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसला म्हणून घाबरू नका, हे उपाय तातडीने करा....

डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसला म्हणून घाबरू नका, हे उपाय तातडीने करा....

डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसल्यावर प्रचंड घाबरायला होतं. आता काय करावं, असं वाटतं आणि मग अनेक जणी तो केस थेट उपटून टाकायला निघतात. पण असं करणं खरोखरंच योग्य आहे का ? पांढरा केस दिसल्यावर सगळ्यात आधी काय करावं बरं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 01:13 PM2021-07-13T13:13:37+5:302021-07-13T13:14:24+5:30

डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसल्यावर प्रचंड घाबरायला होतं. आता काय करावं, असं वाटतं आणि मग अनेक जणी तो केस थेट उपटून टाकायला निघतात. पण असं करणं खरोखरंच योग्य आहे का ? पांढरा केस दिसल्यावर सगळ्यात आधी काय करावं बरं ?

Don't panic as white, grey hair appears on the head for the first time, do this remedy immediately .... | डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसला म्हणून घाबरू नका, हे उपाय तातडीने करा....

डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसला म्हणून घाबरू नका, हे उपाय तातडीने करा....

Highlightsपिगमेंट सेल म्हणजेच केसांना नैसर्गिकरित्या रंग देणाऱ्या पेशी. या पेशी मृत होऊ लागल्या, की डोक्यात पांढरे केस डोकावू लागतात.

आजकाल वयाचा आणि केस पांढरे होण्याचा काहीच संबंध उरलेला नाही. कारण हल्ली कोणत्याही वयात केस पांढरे होण्याची समस्या भेडसावू शकते. अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारातून आपल्याला योग्य पोषण न मिळणं. आपल्या जेवणाच्या सवयी, आहार यामध्ये खूप बदल झालेला आहे. स्ट्रेस लेव्हल वाढली असून अनेकजणी नियमितपणे व्यायामही करत नाहीत. याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे जर डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसला तर घाबरू नका. हे छोटे छोटे उपाय मात्र आवर्जून करून पहा.

 

केस पांढरे का होतात ?
आपल्या डोक्याच्या त्वचेत पिगमेंट सेल असतात. पिगमेंट सेल म्हणजेच केसांना नैसर्गिकरित्या रंग देणाऱ्या पेशी. या पेशी मृत होऊ लागल्या, की डोक्यात पांढरे केस डोकावू लागतात. शाम्पूचा अतिवापर, तेल कमी प्रमाणात लावल्याने डोक्याची त्वचा कोरडी होणे, आहारातून पोषणमुल्ये न मिळणे यामुळे पिंगमेंट सेल मृत होण्याचे प्रमाण वाढते.

 

पांढरा केस उपटून टाकला तर ?
एक पांढरा केस उपटला तर त्याच्या आजूबाजूचे दोन- चार केसही पांढरे होतात, असे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. पण खरोखर असे काही होत नाही. केस पांढरे होणे म्हणजे केसांना कसला तरी संसर्ग होणे नसते. त्यामुळे असे एकाचे इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ शकत नाही. पण पांढरा केस दिसला की टाक उपटून, ही सवय काही चांगली नाही. केस उपटल्यामुळे त्या भागातील फोलिसेलचे नुकसान होते. त्यामुळे पांढरे असो किंवा काळे, केस कधीच उपटू नका.

 

केस पांढरे होत असतील, तर या गोष्टी करा
१. केस अगदी छोटे कापू नका

केस पांढरे व्हायला लागले, म्हणजे केसांची खूप काळजी घ्यावी लागणार. त्यामुळे केस छोटे असतील तर ते मेंटेन करायला बरे पडतील, असे वाटून अनेक जणी केस कापून टाकतात. पण मोठ्या केसांमध्ये काही पांढरे झालेले केस अगदी सहज झाकून जाऊ शकतात. लहान केसात मात्र ते उघडे पडतात. 

 

२. ऑईल बेस हेअर कलर निवडा
एखादा- दुसरा पांढरा केस असेल, तर लगेचच सगळे केस कलर करू नका. अनेकदा केमिकल्स असल्याने हेअर कलर सगळ्यांच्याच डोक्याच्या त्वचेला लागू होत नाही. त्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले, तरच हेअर कलरचा विचार करा. हेअर कलर निवडताना तो ऑईल बेस असावा, याची काळजी मात्र घ्या.

 

३. मेहंदी लावा
पांढरे केस कलर करण्यासाठी आजही मेहंदी हा सगळ्यात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून वापरला जातो. नैसर्गिक मेहंदी वापरल्याने केसांना पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. मेहंदी हे नॅचरल कंडिशनर म्हणूनही ओळखले जाते. 

 

४. कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा 
डोक्यात पांढरे केस डोकावू लागताच चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंग असे कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतील अशी फळे आणि फॉलिक ॲसिड मुबलक असेल अशा भाज्या भरपूर खा. ग्रीन टी घेत जा.  

 

Web Title: Don't panic as white, grey hair appears on the head for the first time, do this remedy immediately ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.