Lokmat Sakhi >Beauty > काळी पडून जास्त पिकलेली केळी फेकू नका! करा हेअर मास्क - रुक्ष, निस्तेज केस होतील मऊमुलायम...

काळी पडून जास्त पिकलेली केळी फेकू नका! करा हेअर मास्क - रुक्ष, निस्तेज केस होतील मऊमुलायम...

Don't throw away overripe bananas turn them into a magical hair mask : Over ripe banana hair mask for frizzy & damaged hair : Best Banana Hair Mask for Hair Growth and Strong Hair : पिकलेली केळी खराब समजून फेकून न देता त्याचा हेअर मास्क कसा करायचा ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 17:16 IST2025-04-07T17:04:00+5:302025-04-07T17:16:55+5:30

Don't throw away overripe bananas turn them into a magical hair mask : Over ripe banana hair mask for frizzy & damaged hair : Best Banana Hair Mask for Hair Growth and Strong Hair : पिकलेली केळी खराब समजून फेकून न देता त्याचा हेअर मास्क कसा करायचा ते पाहा...

Don't throw away overripe bananas turn them into a magical hair mask Over ripe banana hair mask for frizzy & damaged hair | काळी पडून जास्त पिकलेली केळी फेकू नका! करा हेअर मास्क - रुक्ष, निस्तेज केस होतील मऊमुलायम...

काळी पडून जास्त पिकलेली केळी फेकू नका! करा हेअर मास्क - रुक्ष, निस्तेज केस होतील मऊमुलायम...

अनेकदा आपण आठवडाभर लागणारी फळं एकदम एकाच वेळी आणून ठेवतो. या फळांमध्ये आपण केळी देखील विकत आणतो. ही केळी पुढील ३ ते ४ दिवसांत खाऊन संपवली नाहीत तर ती अधिक जास्त पिकून मऊ पडतात. अशा या गरजेपेक्षा जास्त पिकलेल्या केळ्यांवर काळे डाग पडतात. असे काळे डाग पडलेलं आणि मऊ पडलेलं केळ (Don't throw away overripe bananas turn them into a magical hair mask) खायला फारसे कुणाला (Over ripe banana hair mask for frizzy & damaged hair) आवडत नाही. अशावेळी आपण चक्क ती केळी खराब झाली (Best Banana Hair Mask for Hair Growth and Strong Hair) असे समजून कचऱ्यात फेकून देतो. परंतु ही केळी कचऱ्यात न फेकता आपण त्याचा हेअर मास्क तयार करून केसांना लावू शकतो.

अनेकदा आपले केस रुक्ष, निस्तेज आणि रखरखीत होतात. तर काहीवेळा केसांत कोंडा होणे, केसगळती अशा अनेक समस्या सतावतात. अशावेळी आपण केसांसाठी अनेक महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु या महागड्या प्रॉडक्ट्स ऐवजी आपण घरातील पिकलेली केळी फेकून न देता त्याचा हेअर मास्क तयार करु शकतो. पिकलेल्या केळ्यांचा हेअर मास्क कसा करायचा ते पाहूयात.    

साहित्य :- 

१. पिकलेली केळी - २ केळी 
२. दही - २ टेबलस्पून 
३. खोबरेल तेल - २ टेबलस्पून 
४. मध - १ टेबलस्पून

उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...


१ वाटी पुदिन्याचे ५ हेअर मास्क, उन्हात डोकं राहील थंड आणि केसही होतील सुंदर...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पिकलेली केळी घेऊन ती व्यवस्थित मॅश करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
२. आता या केळ्याच्या पेस्टमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून दही, खोबरेल तेल आणि मध मिसळून घ्यावे. 
३. चमच्याने सगळे जिन्नस एकत्रित कालवून मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

पिकलेल्या केळ्याचा हेअर मास्क केसांना लावण्यासाठी तयार आहे. 

याचा वापर कसा करावा ? 

हा तयार हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत ब्रश किंवा हातांच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर केस व्यवस्थित बांधून २० ते ३० मिनिटे हा हेअर मास्क केसांवर तसाच लावून ठेवावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. यानंतर तुम्ही तुमच्या केसांमध्ये दिसणारा फरक नक्कीच पाहू शकता. 

१ चमचा अळशी-१ चमचा तांदळाचं पीठ; ‘हा’ उपाय म्हणजे पार्लरपेक्षा भारी हेअर स्पा! पाहा...

हा हेअर मास्क वापरण्याचे फायदे... 

१. मध :- मध हे केसांसाठी मॉइश्चरायझर आहे जे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.   

२. दही :- दही हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि केस मऊ, चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करते

३. केळी :- केळीमध्ये असलेली पोषक तत्वे केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते. 

४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल स्काल्पचा कोरडेपणा आणि खाज सुटणे कमी करते, तसेच केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Web Title: Don't throw away overripe bananas turn them into a magical hair mask Over ripe banana hair mask for frizzy & damaged hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.