बटाटा ही एक अशी भाजी आहे, जी प्रत्येक पदार्थात फिट होते. ही भाजी जवळजवळ सगळ्यांना आवडते. बटाट्यामध्ये प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, नियासिन आणि थायामिनसह अनेक पोषक घटक आढळतात. अनेक जण बटाट्याची साल फेकून देतात. पण ही साल फेकून न देता, त्याचा वापर केसांसाठी करा.
बटाट्याच्या पौष्टिक तत्वांबद्दल आपण सर्वजण जाणतो, पण बटाट्याच्या सालींमध्ये असे काही पोषक तत्व आहेत, जी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपण बटाट्याच्या सालांचा हेअर मास्क ब हेअर कलर बनवू शकता. या हेअर मास्कच्या वापराने केसांची समस्या कमी होईल. यासह केसांना नवी शाईन मिळेल. व हेअर कलरने केसांना नवा लूक मिळेल(Don't Throw Away Potato Peels, Instead Use it For Hair Care).
बटाट्याच्या सालांचा हेअर मास्क करण्यासाठी लागणारं साहित्य
एक कप बटाट्याची साल
२ चमचे मध
१ चमचा एलोवेरा जेल
चिंचेचा चमकदार फेसपॅक, असा फेकपॅक तुम्ही लावला नसेल कधी, ट्राय करा बघा चेहऱ्यावर चमक
या पद्धतीने बनवा बटाट्याच्या सालांचा हेअर मास्क
बटाट्याच्या सालांचा हेअर मास्क बनवण्यासाठी, प्रथम साले नीट धुवा. त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा, त्यात साली टाकून एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर साली एका प्लेटमध्ये काढून चांगली मॅश करा. शेवटी त्यात मध आणि एलोवेरा जेल घालून चांगले मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचा मास्क केसांना लावा. काही वेळानंतर केस सामान्य पाण्याने धुवा.
हेअर कलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१ वाटी हीना (मेहेंदी) पावडर
२ चमचे बटाट्याच्या सालीचे पावडर
१ टीस्पून एप्प्ल सायडर व्हिनेगर
कलिंगड खा आणि उरलेल्या कलिंगडाचे करा ३ फेसपॅक, चेहरा चमकेल आणि उजळेल
या पद्धतीने बनवा हेअर कलर
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घ्या, त्यात 2 चमचे बटाट्याच्या सालीचे पावडर, व 1 टीस्पून एप्प्ल सायडर व्हिनेगर घालून मिश्रण मिक्स करा. हेअर कलर बनवत असताना त्यात पाणी मिसळू नका.
हेअर कलर वापरण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम, केस चांगले विंचरून घ्या. आता एका बाऊलमध्ये हेअर कलर पावडर व पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण ब्रशच्या मदतीने केसांवर लावा. ४ तासानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. याने केसांना नैसर्गिक रंग चढेल.