Join us  

पिकलेलं केळं फेकू नका, अनुष्का शर्मा करते तसा करा पिकलेल्या केळ्याचा फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 11:53 AM

ब्यूटी सिक्रेट; चेहऱ्याचा ग्लो वाढविण्यासाठी अभिनेत्री वापरतात घरगुती उपाय...

ठळक मुद्देअभिनेत्रीही वापरतात सौंदर्यासाठी घरगुती उपायमहागडी प्रॉडक्ट आणि पार्लरमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हे घारगुती उपाय करुन पाहूया की

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या ब्यूटी आणि फिटनेसबाबत कायमच जागरुक असलेली दिसते. तिच्या ब्युटीची तरुणींमध्ये चर्चा होते आणि तिला फॉलोही केले जाते. कधी ती जार ब्रेकफास्ट करते तर फिटनेससाठीही ती सतत काही ना काही करत असते. आपले सौंदर्य कायम ठेवण्यासाठीही अनुष्का काही ना काही उपाय करत असते. यामध्ये घरगुती उपायांचा जास्त समावेश असल्याचे पाहायला मिळते. ‘डिटॉक्सिफाय होण्यासाठी मी कडुलिंबाच्या पानांचा लेप त्वचेला लावते’ कडुलिंबात त्वचा आणि केसांसंबंधीच्या अनेक समस्या दूर करण्याची क्षमता असते. कडुलिंबात अँण्टिसेप्टिक, दाहविरोधी, जिवाणूविरोधी आणि अँण्टिएजिंग घटक असतात असंही ती सांगते. इतकंच नाही तर  नुकतेच तिने आपले ब्यूटी सिक्रेट शेअर केले असून यामध्ये अनुष्काने पिकलेल्या केळ्याच्या फेसपॅकविषयी सांगितले आहे. त्यामुळे अनुष्काला भारंभार ब्यूटी प्रॉडक्टस वापरण्यापेक्षा घरगुती उपया करणे जास्त आवडत असल्याचे दिसते. 

अनेकदा आपण केळं जास्त पिकलं की ते खाण्यासाठी योग्य नसल्याने आपण ते फेकून देतो. थंडीच्या दिवसांत तर जास्त पिकलेलं केळं खाल्लं तर सर्दी आणि कफ होण्याची शक्यता असते. पण अनुष्का शर्मा या पिकलेल्या केळ्याचा आपल्या सौंदर्यासाठी वापर करते. 'व्होग इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्का या पिकलेल्या केळ्यापासून केलेल्या फेसपॅकविषयी सविस्तरपणे सांगते. यापासून अँटी एजिंग मास्क अतिशय छान तयार होत असल्याचे सांगतानाच मला चेहऱ्यासाठी साधे पण प्रभावी उपाय करायला जास्त आवडते असे अनुष्का म्हणते. 

भारतात केळं साधारणपणे सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारे फळ आहे. केळ्यात अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने अँटी एजिंग म्हणून त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आपले वाढलेले वय सहज दिसू नये यासाठी केळं खाणे आणि फेसपॅकच्या माध्यमातून चेहऱ्याला लावणे उपयुक्त ठरते. वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकुत्या यायला लागतात, तसेच आपण मोठे दिसायला लागतो. मात्र हे प्रमाण कमी व्हावे यासाठी केळं अतिशय उत्तम काम करते. इतकेच नाही तर आपल्याला असणाऱ्या काळ्या डागांची, पुरळ आणि पिंपल्सची समस्या दूर होण्यासाठीही केळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पाहूयात केळ्याचा फेसपॅक कसा तयार करायचा 

साहित्य -

१. पिकलेलं केळं - अर्धे 

२. दही - १ चमचा 

३. मध - १ चमचा 

कृती - 

१. पिकलेले अर्धे केळे हाताने किंवा स्मॅशरने बारीक करुन त्याची पेस्ट तयार करा.

२. यामध्ये १ चमचा दही आणि १ चमचा मध घाला.

३. हे मिश्रण एकजीव करुन घ्या म्हणजे तुमचा फेसपॅक तयार होईल.

४. चेहऱ्याला सगळीकडे हा पॅक एकसारखा लावा. 

५. २० मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

फायदे - 

१. केळ्यामध्ये व्हीटॅमिन ए, बी,सी आणि ई हे घटक असतात. तसेच लोह आणि पोटॅशियमही भरपूर प्रमाणात असते. 

२. या पॅकमुळे चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

३. थंडीमुळे त्वचेला येणारा कोरडेपणा दूर करण्यासाठी हा फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरतो.

४. केळं, दही आणि मध या तिन्ही पदार्थांमुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यासाठी हा फेसपॅक उत्तम उपाय आहे.  

५. त्वचा मऊ व चमकदार बनवण्यासाठी या फेसपॅकचा चांगला उपयोग होतो. 

६. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. 

७. चेहऱ्यावर जास्त प्रमाणात काळे डाग, पिंपल्स असतील तर ते निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सअनुष्का शर्माहोम रेमेडीत्वचेची काळजी