नितळ,गोरी, सुंदर त्वचा हे प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत. त्यासाठी स्त्रिया सतत काही ना काही नवनवीन प्रयोग करत असतात. पण चेहऱ्याला महागडी उत्पादने लावण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले कधीही चांगले. आपल्याला चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, चेहऱ्यावर डाग पडत असतील किंवा त्वचा खूप कोरडी होत असेल तर त्यामागची कारणे शोधून त्यानुसार घरगुती उपचार करायला हवेत. चेहऱ्याला महागडी ब्रँडेड उत्पादने लावून काही उपयोग होत नाही.अशावेळी घरगुती उपाय करून आपण आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी आपण फळांचे सेवन करतोच. फळांचे सेवन करून झाल्यानंतर या फळांच्या साली फेकून न देता, या सालींचा वापर करून आपली त्वचा सुंदर व तजेलदार ठेवू शकतो. बऱ्याच खाद्यपदार्थांद्वारे आपल्या त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. विशेषतः फळांमध्ये नैसर्गिक पोषक घटकांचा समावेश अधिक असतो. फळांच्या सेवनामुळे वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांचाही आपल्या त्वचेला लाभ मिळतो. त्यामुळे फळ खाऊन झाल्यावर तुम्ही त्यांच्या साली फेकून न देता त्वचा फ्रेश, सुंदर, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा वापर करा(How You Can Use Fruit Peels For Healthier Skin).
नक्की काय करता येऊ शकत?
१. टोमॅटो - टोमॅटोच्या गोल चकत्या कापून या चकत्या आपण चेहऱ्यावर ठेवू शकता. या टोमॅटोच्या चकत्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून घ्या. आपल्या चेहेऱ्यासाठी टोमॅटोचा वापर करणे यापेक्षा काहीही चांगले नाही. साधारण तासाभरात तुमची त्वचा हा रस पूर्णपणे शोषून घेईल. यानंतर तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि त्वचेची आर्द्रता अनुभवा. टोमॅटोमध्ये सायट्रिक अॅसिड आणि मॅलिक अॅसिड असते. हे दोन्ही त्वचेवरील डेड स्किनचा थर काढून टाकतात. यामुळे तुम्हाला अधिक शायनी आणि ग्लोइंग त्वचा मिळते.
२. बटाटा - बटाट्यामध्ये कित्येक नैसर्गिक गुणधर्मांचा समावेश आहे. यामुळे आपली त्वचा सुंदर, नितळ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. त्वचा टॅन होणे ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. त्यातून सुटका मिळवण्यासाठी बटाट्याचा वापर केला जाऊ शकतो. आपल्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल आले असतील तर कच्च्या बटाटयाच्या चकत्या करून त्या डोळ्यांवर ठेवा. याच बटाट्याच्या चकत्या संपूर्ण चेहेऱ्यावर फिरवल्यास टॅनिंग झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होईल.
३. नारळाचा किस - नारळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय, ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास उपयुक्त ठरते. यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. जे सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते. नारळ खवून त्याचा बारीक किस करावा. त्यानंतर हा खवलेला नारळ मिक्सरला लावून त्यात थोडेसे पाणी घाला. मिक्सर मधील हे मिश्रण एका स्वच्छ सुती कापडात गाळून घ्या. नारळातून निघालेले दूध बाजूला ठेवून त्यातील जो चोथा उरला आहे ती चेहऱ्याला लावून घ्यावा. असे केल्यास नारळातील पोषक तत्व आपल्या त्वचेला मिळून, त्वचा तजेलदार व फ्रेश दिसते.
४. पपईची साल - आपण आहारामध्ये पपईचा समावेश तर नक्कीच करतो. त्याचप्रमाणे चेहऱ्यासाठी आपण पपई फेस पॅकचाही उपयोग करू शकतो. यासाठी पपईची पातळ पेस्ट करावी आणि चेहऱ्यावर लावावी. याशिवाय पपई खाऊन झाल्यावर त्याची साल संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. यामुळे पपईच्या सालीत असणारे पोषक तत्त्व आपल्या त्वचेला मिळतात.
५. केळ्याची साल - केळ्याच्या सालीचा त्वचेसाठी वापर करताना केळ्याची साल नेहमी ताजी असावी हे लक्षात ठेवा. केळीच्या सालीने चेहऱ्यावर साधारण २० ते २५ मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरूकुत्या गायब होतील आणि आपली त्वचा ग्लोईंग होईल. आपल्या त्वचेसाठी केळीची साल गुणकारी आहे. केळीची साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.
फळे खाल्ल्यानंतर त्यांच्या साली फेकून न देता त्यांच्या सालींचा आपल्या त्वचेसाठी कसा वापर करावा याबद्दल काही टीप्स satvicmovement या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आल्या आहेत.