हेमा मालिनी म्हणजे एकेकाळी आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री. ७० च्या दशकात आपल्या दमदार अभियनाने सिनेसृष्टीत एक स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून त्यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. इतके वर्ष होऊनही त्यांचे सौंदर्य आजही तितकेच मनाचा ठाव घेणारे आहे. आता ७३ वर्षांची ही अभिनेत्री आपल्या निरलस सौंदर्यासाठी नेमके काय करते हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे फॅन फॉलोइंग कमी झालेले नाही. काही मुलाखतींमध्ये हेमामालिनी यांना त्यांच्या नितळ त्वचेबाबत विचारण्यात आले असता त्या डाएटपासून व्यायामापर्यंत करत असलेल्या गोष्टी आवर्जून सांगतात. आहार, व्यायाम याबाबत त्या अतिशय काटेकोर असून त्या चेहऱ्याला लावत असलेल्या उत्पादनांबद्दलही त्या सांगतात. आपणही अगदी सहज या सगळ्या गोष्टी करु शकतो. तेव्हा पाहूया आजही मेकअप न करता हेमामालिनी यांचा चेहरा कसा ग्लो करतो आणि आताच्या अभनेत्रींपुढेही त्या भाव खाऊन जातात.
जेवणाच्या बाबतीत घेतात ही काळजी
हेमा मालिनी जेवणात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करतात. त्या पूर्णपणे शाकाहारी असून त्या अजिबातच जंक फूड आणि बाहेरचे अन्नपदार्थ खात नाहीत. घरातील पदार्थांमध्येही त्या कमी तेल आणि कमी मसालेदार खाणे पसंत करतात. रात्री ८ च्या आधी त्यांचे जेवण झालेले असते, तसेच त्या रात्रीचा आहार अतिशय कमी आणि हलका घेतात. रात्री हलके खाल्ल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.
पाणी पिताना ही काळजी घेतात
आपल्या त्वचेवर हेमामालिनी अरोमा ऑईल वापरतात. तसेच क्लिंजिक मिल्कचाही त्या वापर करतात. त्वचेमध्ये हायड्रेशन राहावे यासाठी त्या रोज दोन ते तीन लिटर पाणी पितात. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचेवरचा ग्लो चांगला राहण्यासाठी जास्त पाणी पिणे उपयोगी ठरते. त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्हालाही त्वचा दिर्घकाळ तरुण राहावी असे वाटत असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
या सौंदर्य उत्पादनांचा करतात वापर
हल्ली अनेक अभिनेत्री आपण वापरत असलेल्या सौंदर्य उत्पादनांबद्दल बोलणे टाळतात. मात्र हेमामालिनी आपण वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल मोकळेपणाने बोलतात. त्या सांगतात त्वचेवरील सुरकुत्या दिसू नयेत म्हणून मी अँटी एजिंग क्रिमचा वापर करते. या उत्पादनांमुळे तुम्ही नक्कीच चांगले दिसू शकता. तज्ज्ञांच्या सल्ल्याने अशी उत्पादने वापरणे यात काहीच गैर नाही.
डाएटबरोबरच तज्ज्ञांची मदत ठरते उपयोगी आपली त्वचा आणि एकूण आरोग्य उत्तम राखण्यासाठी हेमामालिनी आहारात डाळ, भाजी आणि पोळीचा समावेश करतात. तसेच त्या नियमितपणे सकाळच्या वेळेत दही खातात, त्यामुळे त्यांच्या त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होते. त्यांची ब्यूटीशियन त्यांच्यासाठी खास तेल बनवते, जे दररोज लावल्यामुळे त्यांचा चेहरा जास्त ग्लो करायला मदत होते. तसेच मेकपविना राहणे त्यांना जास्त आवडते, ज्यामुळे चेहऱ्यावरची त्वचा मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल.