Lokmat Sakhi >Beauty > दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?

दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?

Sharara or Gharara: शरारा आणि घरारा यात नेमकं काय वेगळेपण की एकाच कपड्याची ही दोन वेगवेगळी नावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचा शरारा आणि घरारा यांच्यातला मुख्य फरक (difference between Sharara and Gharara) आणि त्यांची खासियत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 04:41 PM2022-09-21T16:41:43+5:302022-09-21T16:48:41+5:30

Sharara or Gharara: शरारा आणि घरारा यात नेमकं काय वेगळेपण की एकाच कपड्याची ही दोन वेगवेगळी नावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचा शरारा आणि घरारा यांच्यातला मुख्य फरक (difference between Sharara and Gharara) आणि त्यांची खासियत...

Dress Shopping for Dussehra- Diwali Festivals: Sharara or Gharara? What is the difference between two?  | दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?

दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?

Highlightsशरारा आणि घरारा यात नेमकं काय वेगळेपण?बऱ्याचजणी तर घागरा, लेहेंगा, शरारा असे पारंपरिक आणि हेवी वर्क असणारे कपडे आवर्जून दसरा- दिवाळीला खरेदी करतात.

यंदा दसरा- दिवाळीसाठी ( Dussehra- Diwali Festivals) नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे, हे काही ठरलं की नाही? एरवी वर्षभर आपण आपल्याला हवे तसे नवनवे कपडे घेत असतो. पण दसरा- दिवाळी आणि दुसरं म्हणजे लग्नसराई यासाठी जेव्हा आपण खरेदी करतो (dress Shopping) तेव्हा महागडे, भरजरी कपडे घेण्याकडे आपला कल असतो. बऱ्याचजणी तर घागरा, लेहेंगा, शरारा असे पारंपरिक आणि हेवी वर्क असणारे कपडे आवर्जून दसरा- दिवाळीला खरेदी करतात. तुम्हालाही यंदा असे भरजरी कपडे घ्यायचे असतील तर शरारा किंवा घरारा (Sharara or Gharara) यापैकी काहीतरी ट्राय करू शकता.

 

घरारा म्हणजे नेमकं काय?
शरारा हा शब्द किंवा शरारा हा ड्रेसचा प्रकार आपण ऐकलेला किंवा पाहिलेला असतो.

शुभ्र पांढरे कपडे काही दिवसांतच पिवळट, काळपट पडतात? 3 उपाय, कपडे पुन्हा चमकतील नव्यासारखे

पण घरारा मात्र त्या तुलनेत आपण कमी ऐकलेला असतो. पण तसं पाहायला गेलं तर १९ व्या शतकापासून घरारा प्रचलित आहे. नवाब घराण्यातल्या स्त्रिया असे कपडे घालायच्या. त्यामुळे त्याला नवाबी पहनावा म्हणूनही ओळखलं जातं. घरारा हा लखनऊचा पारंपरिक ड्रेस म्हणूनही ओळखला  जातो. 

 

घरारा म्हणजे गुडघ्याच्या वरपर्यंत येणारा कुर्ता आणि त्याच्याखाली मोठा घेर असणारी पॅण्ट. जवळपास १० ते १२ मीटर कपडा वापरून घराऱ्याची सलवार शिवण्यात येते.

नवरीची कमाल! प्री- वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण की... तुम्हीही म्हणाल खड्ड्यात गेलं..

या सलवारवर जरदोजी, जरी किंवा कशिदाकारी वर्क केलेलं असतं. पुर्वी मुस्लिम महिलांमध्ये हा ड्रेस अधिक प्रचलित होता. पाकिस्तान, बांग्लादेश येथेही घरारा घातला जातो. उंची कमी असेल तर शरारापेक्षा घरारा अधिक छान दिसतो. 

 

शरारा
लेहेंगा किंवा घागरा या नावानेही शरारा ओळखला जातो. शरारा म्हणजे खूप मोठा लाँग स्कर्ट.. शॉर्ट किंवा लाँग टॉप यासोबत शरारा घातला जातो. सिल्क किंवा सिंथेटिक प्रकारात शरारा उपलब्ध असतो. तसेच त्यावरही मिरर वर्क, गोटी वर्क, जरदोसी, एम्ब्रॉयडरी असं हेवी वर्क केलं जातं. चांगली उंची असणाऱ्यांना शरारा छान दिसतो.  

 

Web Title: Dress Shopping for Dussehra- Diwali Festivals: Sharara or Gharara? What is the difference between two? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.