Join us  

उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास मॅंगो स्मूदी, मिळवा चमकदार चेहरा, त्वचेचे आजार होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 6:08 PM

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांवर चविष्ट उपाय; 1 ग्लास मॅंगो स्मूदीनं मिळते चमकदार त्वचा

ठळक मुद्देमॅंगो स्मूदी पिल्याने आंब्यातील गुणधर्मांचा फायदा त्वचेस होतो. मॅंगो स्मूदी करताना त्यात एक खरबुजाची फोडही घालावी. उन्हाळ्यात त्वचा चमकदार आणि दोषरहित दिसण्यासाठी मॅंगो स्मूदी पिण्याचा सल्ला दिला जातो.

उन्हाळा सुरु झाला की पाठोपाठ त्वचेचे विकारही डोकं वर काढतात. त्वचा तेलकट होणं, उन्हानं त्वच काळवंडणं, रापणं, त्वचेवर पुरळ येणं, स्किन ॲलर्जी, फोड येणं यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांच्या बाबतीत केवळ बाह्य उपचार करुन चालत नाही तर आहाराचंही विशिष्ट नियोजन करणं आवश्यक असतं. उन्हाळ्यात त्वचा निरोगी राहाण्यासाठी, चमकदार दिसण्यासाठी मॅंगो स्मूदी पिणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

आंबा आरोग्यासाठी जेवढा पौष्टिक तितकाच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आंब्यात अ, क आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. ही जीवनसत्व त्वचेसाठी फायदेशीर असतात. आंब्यातील या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या बऱ्या करता येतात. आंब्याचं सेवन केल्यानं त्वचा स्वच्छ होतात. आंब्यामुळे उन्हापासून त्वचेचं संरक्षण होतं. आंब्यातील या गुणधर्मांमुळेच आंब्याचा उपयोग त्वचा विकारावर करता येतो. उन्हाळ्यात त्वचा चमकदार आणि दोषरहित दिसण्यासाठी मॅंगो स्मूदी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Image: Google 

मॅंगो स्मूदी करताना त्यात थोडं खरबूजही घालावं. खरबुजामध्ये त्वचेस फायदेशीर अ आणि क जीवनसत्व असतात. तसेच खरबुजामध्ये भरपूर असल्यानं ते आरोग्यास आणि त्वचेस फायदेशीर असतं. खरबुजामध्ये असलेल्या  ॲण्टिऑक्सिडण्टस गुणधर्मामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

Image: Google

त्वचेस फायदेशीर मॅंगो स्मूदी कशी कराल?

मॅंगो स्मूदी करण्यासाठी एक आंबा, खरबुजाची एक काप, अर्धा कप दूध / आवश्यकतेनुसार, मध, 4-5 बदाम, 4-5 बेदाणे, 2 चमचे सब्जा घ्यावा. मॅंगो स्मूदी करण्यासाठी आंब्याचा गर काढून घ्यावा. आंब्याचा गर आणि खरबुजाची एक फोड मिक्सरमधून बारीक करुन घ्यावं. वाटताना  त्यात दूध घातलं तरी चालतं. एका भांड्यात आंबा खरबुजाचं मिश्रण काढावं. त्यात सब्जा घालून तो चांगला मिसळून घ्यावा.  मिश्रण 30 ते 45 मिनिटं तसंच फ्रिजमध्ये ठेवावं.  स्मूदीमध्ये बेदाणे बारीक चिरुन, बदामाचे तुकडे करुन घालावे. या स्मूदीमध्ये थोडी चाॅकलेट पावडर आणि थोडं केळ चिरुनही घालता येतं. 

टॅग्स :आहार योजनाब्यूटी टिप्सआंबात्वचेची काळजी