Join us  

Beauty Tips : सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्या 2 खास पेय, चेहरा दिसेल कायम ग्लोईंग-सतेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 2:29 PM

Beauty Tips : या रेसिपी जसाच्या तशा केल्या आणि नियमितपणे घेतल्यास आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडू शकते. 

ठळक मुद्देहे पेय घ्यायल्यास ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.त्वचा कोरडी पडणे, सुरकुतणे, पिंपल्स येणे या समस्यांपासून सुटका होण्यासाठी घरच्या घरी करता येणारा सोपा उपाय

प्रत्येक महिलेला आपली स्कीन ग्लोईंग असावी असं वाटत असतं. पण कधी आहारातील बदलांमुळे तर कधी प्रदुषणामुळे, कधी ताणतणाव तर कधी पुरेशी झोप न झाल्याने, पोट खराब असल्यास चेहरा खराब होतो. मग आपण त्यावर महागडी उत्पादने लावतो किंवा काही ना काही घरगुती उपाय करतो. मात्र त्वचा ग्लोईंग दिसण्यासाठी इतर गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात तितकाच आपला आहार आणि पोट साफ असणेही आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. (Beauty Tips) यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी राजेंद्र आहारात कोणती पेय घेतल्यास त्वचेवर चमक येण्यास त्याचा फायदा होतो ते सांगतात. या रेसिपी जसाच्या तशा केल्या आणि नियमितपणे घेतल्यास आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडू शकते. 

(Image : Google)

सकाळी उठल्यावर घ्यायचे पेय 

रेसिपी - 

१. रात्री झोपताना पाण्यात चमचाभर चिया सीडस भिजत घाला.२. सकाळी एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर घ्या, त्यामध्ये एका आवळ्याच्या फोडा घाला. ३. ७ ते ८ पुदिन्याची पाने आणि ७ ते ८ तुळशीचा पाने घाला. ४. या सगळ्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिक्सरवर फुरवून बारीक करुन घ्या. ५. हे मिश्रण एका ग्लासमध्ये घेऊन त्यात खडे मीठ आणि रात्रभर भिजवलेल्या चिया सीडस घाला.६. रोजच्या रोज हे प्यायल्याने त्वचा तजेलदार होण्यास याचा चांगला फायदा होतो. 

फायदे - 

१. पुदिन्याच्या पानांमुळे त्वचेची रंध्रे उघडण्यास आणि त्यातील घाण बाहेर पडण्यास उपयोग होतो. पुदिना अस्टींजंट म्हणून काम करत असल्याने त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास त्याची मदत होते. २. तुळशीच्या पानांममध्ये अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीइन्फ्लमेटरी घटक असल्याने पुरळ, कोरडेपणा आणि इतर समस्यापासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी तुळशीच्या पानांचा चांगला उपयोग होतो. ३. चिया सीडसमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. ४. कोरफड, आवळा हेही आरोग्यासाठी तसेच सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

(Image : Google)

रात्री झोपताना घ्यायचे पेय 

रेसिपी - 

१. एका काकडीचे बारीक तुकडे करुन ते एका बाऊलमध्य़े ठेवा.२. त्यामध्ये ६ ते ७ पुदीन्याची पाने घालून त्यावर अर्धे लिंबू पिळा.३. यामध्ये अर्धा चमचा जीरे पावडर आणि चवीपुरते खडे मीठ घाला. ४. पाणी घालून हे मिश्रण मिक्सर करा आणि रात्री झोपताना प्या 

फायदे - 

१. चेहऱ्यावरचा लालसरपणा, पुरळ आणि सूज कमी होण्यास काकडी अतिशय उपयुक्त असते. २. जीऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरीयल घटक असल्याने पुरळ येण्यापासून त्वचेचे संरक्षण होण्यास जीरे उपयुक्त ठरतात.३. लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते हे आपल्याला माहीत आहे, यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्वचेसाठी फायदेशीर असतात. ४. रात्रीच्या वेळी शरीराला आराम मिळाल्याने ते एकप्रकारे हिल होत असते त्यावेळी हे पेय घ्यायल्यास ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. तसेच त्वचा अकाली सुरकुतण्याच्या समस्येसाठीही हे पेय उत्तम उपाय आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीघरगुती उपाय