बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ती स्वतःच्या फिटनेसची खूप काळजी घेते. तिचा चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो प्रत्येकाला भावतो. चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी ती घरगुती साहित्यांना प्राधान्य देते. वयाच्या ३९ वर्षातही ती तितकीच तरुण दिसते. फिटनेससह ती चेहऱ्यावरील ग्लो राखण्यासाठी एवोकॅडोपासून तयार स्मुदी पिते. एवोकॅडोचे अनेक फायदे आहेत. एवोकॅडोमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, फॉस्फरस आणि झिंक बऱ्याप्रमाणात आढळते. याच्या पौष्टीक तत्वांमुळे शरीराला उत्तम उर्जा मिळते.
स्वतःला एनर्जेटिक ठेवण्यासाठी कतरिना पिते स्मुदी
कतरिना आपल्या दिवसाची सुरुवात स्मुदी पिऊन करते. जेव्हा तिला ब्रेकफास्ट करण्याचा वेळ मिळत नाही तेव्हा ती एवोकॅडोपासून तयार स्मुदी पिते. तिला या स्मुदीपासून दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.
एवोकॅडो स्मुदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१ एवोकॅडो
२ केळी
पुदिन्याची पानं
चिया सीड्स
लिंबाचा रस
कोको पावडर
मध अथवा खजूर
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एवोकॅडो, केळ, पुदिन्याची पानं, चिया सीड्स, लिंबाचा रस, कोको पावडर, खजूर टाका. व हे संपूर्ण मिश्रण बारीक करून घ्या. घट्ट पेस्ट तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे कतरिना फेवरेट एवोकॅडो स्मुदी. आपण ही स्मुदी सकाळी नाश्ता खाण्याच्या आगोदर पिऊ शकता.